प्रतिनिधी.. इमरान शेख
सुलतानपूर ता.लोणार
स्थानिक सुलतानपूर येथील स्थित डॉ. आर एन लाहोटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये महाराष्ट्र शासनाचा 100 दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत नवीन फौजदारी कायद्याबद्दल माहिती देणे आणि जनजागृती अभियान यशस्वीरित्या बुलढाणा पोलीस दल व मेहकर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले याप्रसंगी मेहकर येथील सरकारी वकील व पोलीस कर्मचारी यांनी आपले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अर्धांगवायू तज्ञ डॉ हेमराज लाहोटी आदर्श बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ सुलतानपूर यांचे अध्यक्ष संजय भाऊ लाहोटी संस्थेचे सचिव श्री सोमेश लाहोटी पोलीस निरीक्षक श्री भाऊराव घुगे मेहकर अॕड नलिनी केनवडकर अॕड अंजली देशमुख अॕड दुर्गा ठोकळ सरकारी अभिव्यता अॕड प्रदीप अवचार प्राचार्य अतुल पडघान प्राचार्य डॉ नंदू कायंदे उपस्थित होते अॕड नलिनी केनवडकर सरकारी वकील मेहकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सायबर क्राईम त्यामध्ये विद्यार्थ्यांची होत असलेली फसवणूक वाढती गुन्हेगारी व अशा गुन्ह्यामधून आपण कायदेशीर रित्या बचाव कसा करावा सायबर क्राईम मध्ये असलेल्या तरतुदी त्याविषयी कायदे. कायद्याचे उल्लंघन झाल्यास असलेल्या शिक्षांची तरतूद याविषयी अॕड नलिनी केनवडकर यांनी मार्गदर्शन केले अॕड अंजली देशमुख यांनी पोस्को विनयभंग छेडछाड रॅगिंग यामध्ये विद्यार्थ्यांची होत असलेले शैक्षणिक नुकसान याविषयी मार्गदर्शन केले आपल्या भाषणामध्ये अॕड दुर्गा ठोकळ यांनी ह्युमन ट्रेफिकिंग याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली सरकारी अभिव्यता अॕड प्रदीप अवचार यांनी बी एन एस एस बी एन एस व भारतीय न्याय संविधानात नव्याने आलेले कायदे त्यामधील तरतुदी विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना त्यामधील असलेल्या कायदेशीर तरतुदी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भाऊराव घुगे आपले मनोगत व्यक्त करताना सोशल मीडियाचा अतिवापर विद्यार्थ्यांना कसा घातक ठरू शकतो व त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याविषयी मार्गदर्शन केले व अशी एखादी अप्रिय घटना जर समाजामध्ये घडली तर पोलीस प्रशासन आपल्याला त्यामध्ये कशाप्रकारे कायदेशीर सहकार्य करते याविषयी जनजागृती केली समारोपिय भाषण करताना प्राचार्य डॉक्टर नंदू कायंदे यांनी विद्यार्थ्यांना यामधून बोध घ्यावा असे प्रतिपादन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा स्वप्निल इरतकर यांनी व्यक्त केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य अतुल पडघान यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी पार पडली सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





Social Plugin