मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगांव -दि 22 जाने 2025 मालेगाव परिसरातील चोरीसारख्या वाढत्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनकडून नागरिकांना सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपल्या घरासमोर किंवा दुकानाच्या मुख्य रस्त्यावरील बाजूस कॅमेरा बसवल्यास चोरीसारख्या घटनांवर आळा घालण्यास मदत होईल,तसेच चोरी झालीच तर गुन्हेगार शोधण्यासाठी कॅमेऱ्याचे फुटेज महत्त्वपूर्ण ठरू शकते विशेषतः मालेगाव परिसरातील "नगरपंचायत ते लोकपंचायत" या व्हॉट्सअॅप सोशल मीडिया गटाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीही प्रशंसनीय उपक्रम राबविले आहेत ढवळेश्वर संस्थान परिसरातील तलावाचे खोलीकरण लोकवर्गणीच्या साहाय्याने पूर्ण करण्यात आले होते तसेच मालेगाव जुने बसस्टॉप येथे पोलीस स्टेशनजवळ महिलांसाठी टिनशेडसह स्वच्छतागृह उभारण्याचे स्तुत्य कार्यही या गटाने केले होते या उपक्रमांमुळे मालेगावकरांमध्ये सामाजिक कामांसाठी जागरूकता निर्माण झाली असून,कॅमेऱ्यांसाठीही अशीच एक सामूहिक चळवळ उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. "एक कॅमेरा सामाजिक कार्यासाठी" या मोहिमेत सहभागी होऊन नागरिकांनी आपला परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे सामाजिक सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा प्रशासनाची जबाबदारी नाही,तर प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने केवळ चोरीच नाही तर इतर कोणत्याही अनुचित प्रकारांवरही नियंत्रण ठेवता येऊ शकते मालेगाव पोलीस स्टेशन व सामाजिक कार्यकर्त्यांकडून या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे सामूहिक प्रयत्नांनीच सुरक्षित आणि शांत समाजाची निर्मिती होऊ शकते.
"सुरक्षित समाजासाठी आजच पुढाकार घ्या!"





Social Plugin