Ticker

6/recent/ticker-posts

अकोला येथे तेली समाज वधू-वर परिचय मेळावा संपन्न



   प्रतिनिधी बळीराम राऊत मेहकर


                 दिनांक 05 जानेवारी2025 कर्मचारी भवन अकोला येथे पार पडलेल्या तेली समाज वधू वर  परिचय मेळाव्यास असंख्य तेली समाज बांधवांनी हजेरी लावली मेळावा  व्यवस्थित रित्या पार पडला मेळाव्याचे नियोजन अतिशय सुटसुटीत होते. मेळाव्यास अध्यक्ष म्हणून समाजाचें ज्येष्ठ समाजसेवक मेहकर संताजी कॉन्व्हेंट चे संस्थापक अध्यक्ष श्री मधुकर गायकवाड मामा यांनी भूषविले, कार्यक्रमांमध्ये सन्माननीय पाहुण्यांची यथोचित  भाषणे या ठिकाणी झाली सोनगीर येथील ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार चौधरी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं मार्गदर्शन केलं अध्यक्षीय भाषणात श्री मधुकर मामा गायकवाड यांनी तेली समाजात वधू-वर परिचय मेळावा का घ्यावा याचे महत्व प्रगट केले शेखरची काटेकर श्री काळेसाहेब केदार ताई वानखेडे साहेब शिंदे साहेब  यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला लाभली तसेच मंगरूळपीर येथील समाजसेविका संगीता ताई भोजने यांनी अनेक वधू वर पालक भेटी करून दिल्या. 

कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी यावेळी महिला वर्गांनी घेतली हे विशेष यामध्ये सो सोनाली नालींदे, सो जयश्री इंगळे यांनी आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडत समाज बांधवांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं वधु वर परिचय मेळावा पार पाडण्यासाठी, श्री भुसारी साहेब, शेषरावजी काळेसाहेब बंडूभाऊ करडे, प्रवीण जी इंगळे, नंदूभाऊ राऊत, अमोल केदारे श्री वनस्कर, श्री नालींदे, श्री हरणे, श्री खराट, श्री खरात, श्री वानखेडे, श्री नाकाडे व सर्व समाज बांधवांनी आपापल्या परीने सर्वतोपरी हातभार लावला आणि त्यामुळे तेली समाजाचा वधू-वर परिचय मेळावा चांगल्या पद्धतीने पार पडला त्याबद्दल समाजामध्ये सर्व आयोजक मंडळींचे कौतुक आणि आभार व्यक्त करण्यात येते, आणि पुढील वर्षी सुद्धा अशाच प्रकारे वधू वर परिचय मेळावा घडून यावा यासाठी सर्व समाज बांधवांनी संत शिरोमणी  संताजी महाराज जगनाडे यांच्या चरणी प्रार्थना केली