Ticker

6/recent/ticker-posts

बंजारा समाजाचे लोणार येथे भव्य लेगी स्पर्धेचे आयोजन



प्रतिनिधी- माणिक चव्हाण   

बंजारा समाजातील प्रमुख सण म्हणून लोणार येथे लेंगी स्पर्धेचे आयोजन केलेले असून सर्व समाज बांधवांना या स्पर्धेमध्ये  सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसाचे आयोजन केलेले आहे या स्पर्धेमध्ये बंजारा समाजातील कल्चर वेशभूषा चालीरीती अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात  या स्पर्धेचे प्रमुख कारण असे की समाजातील लोकांना आपल्या संस्कृतीची माहिती या स्पर्धेतून होत असते या लेंगी स्पर्धेचे आयोजन दिनांक 01 मार्च 2025 वेळ सकाळी 11 वाजता आयोजित केले आहे या कार्यक्रमाचे स्थळ संत सेवालाल महाराज मंदिर प्रांगण आठवडी बाजार लोणार बंजारा तांडा या ठिकाणी आयोजित केले आहे.

 या कार्यक्रमाचा विषय 01- संत सेवालाल महाराजांची अमृतवाणी 02 सेवालाल महाराजांचे जीवन चरित्र 03 शामकी माता जीवन चरित्र 04 वसंतराव नाईक जीवन चरित्र 05 बंजारा संस्कृती व व्यसनमुक्ती या विषयावर ही लेंगी स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगानंद महाराज रायसिंग महाराज हिम्मत महाराज असे अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे.

 या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सिद्धार्थ जी खरात साहेब आमदार मेहकर लोणार मतदारसघ माननीय संजय रायमुलकर साहेब माजी आमदार माननीय राजेश जी राठोड आमदार मंठा माननीय मनोज जी कायंदे आमदार सिंदखेड राजा माननीय बळीभाऊ मापारी शिवसेना जिल्हाप्रमुख बुलढाणा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी लोणार तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लेंगी स्पर्धेचे आनंद घेण्यासाठी हजर राहावे  सर्व ही नम्र विनंती.                   ‌