मारोती एडकेवार
प्रतिनिधी :
हिप्पारगा थडी : प्रजासत्ताक दिनानिमित्त हिप्परगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे, सांस्कृतिक कार्यक्रम दि. 5/2/2025 रोजी संध्याकाळी साजरा झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रहेबर इनामदार,व कार्यक्रमाचे आयोजक शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सय्यद यजास,व उपाध्यक्ष सय्यद उमर,व शाळेचे मुख्याध्यापक मुत्येपोड सर, प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम,खूप उत्साहामध्ये साजरा झाला.विविध धार्मिक व देशभक्ती वरील गीतावरती चिमुकल्यांनी आपली कला सादर केली. व कर्माचे फळ, या नाटकांमध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये नाटक सादर करण्यात आला. कर्माचे फळ या नाटकाचे लेखक व दिनदर्शक,माननीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा थडी येथील शिक्षक नाईक सर,यांनी महाराष्ट्रामध्ये वावरणाऱ्या, ग्रामीण भागातील एका गरीब कुटुंबाची,वास्तव घडलेल्या असे घटनांची त्यांच्या कर्माचे फळ,या नाटकातून सादर केले.एखाद्या गरीब कुटुंबावर कसा अन्याय होतो, अन्यायवर मात करण्यासाठी त्यांचं कसे त्यांचे कर्म बदलतात, हा दृष्टिकोन आणि वास्तववादी विचार हिप्परगा थडी येथील सर्व पालका व विद्यार्थ्यांपुढे सादर करण्यात आला. सूत्रसंचालन गेंदेवार सर यांनी उत्कृष्टरित्या केले,व सरपंच इनामदार रहेबर, माजी सरपंच साहेबराव अंजनीकर,माजी सरपंच मिया पटेल, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे म्हणून हिप्परगा थडी चे पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष पत्रकार मित्र, व ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य सरपंच व उपसरपंच आणि सर्व गावकरी पालक शिक्षणप्रेमी महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गायकवाड सर केसराळीकर यांनी केले.





Social Plugin