Ticker

6/recent/ticker-posts

चाळीसगाव पाटणादेवी रोड कपिलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्र निमित्त भव्य पालखी



प्रतिनिधी  दीपक गुरव@     चाळीसगाव 

   महापूजेचे आयोजन करण्यात आले या महापूजेचे मानकरी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पीएसआय श्री किरण कुमार कबाड्डी व तसेच चाळीसगाव व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप दादा देशमुख यांनी संध्याकाळी,,7 वाजता महापूजा केली व तसेच कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी चाळीसगाव येथील सद्गुरु बँड पथकाने आपल्या मधुर धुंदने सर्व शिवभक्तांचे लक्षवेधले या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष व लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

या मिरवणुकीची रूपरेषा अशी होती राजनगाव दरवाजा ते आडवा बाजार,, बहाळ दरवाजा ते रथ गल्ली या मार्गाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली त्यानंतर कपिलेश्वर महादेव मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले मंदिरामध्ये प्रचंड अशी भाविकांची एकच गर्दी झाली होती या सर्व शिवभक्तांनी ५, ते ६, दिवसापासून मेहनत घेतली व मंदिरास रंग रंगोटी डेकोरेशन केले व सर्व कार्यकर्त्यांनी आपापले काम जोमाने केले व कार्यक्रमास शोभा वाढवली या कार्यकर्त्यांचे चौकामध्ये कौतुक होत आहे व या कार्यक्रमांमध्ये चाळीसगाव शहर पोलीस स्टॉप चे अनमोल सहकार्य होते व सर्व कार्यकर्ते त्यांचे आभारी आहेत व तसेच कार्यक्रम चालू असताना ठिकठिकाणी केळी वाटप साबुदाणा वाटप व सरबत देण्यात आले मंदिरामध्ये साबुदाणा केळी वाटण्यात आली