देगलूर - प्रतिनिधी - जावेद अहेमद
द लास्ट फार्मर ( तामिळ सिनेमा) २०२२
येरगी ग्राम या ठिकाणी असलेल्या चालुक्य कालीन संपदेचा, येरगी ग्रामस्थानी केलेला प्रचार प्रसाराच्यां सुरुवात करण्याच्या घटनेला आता आदमासे दीड वर्षांचा कालावधी झाला आहे. आता या संपदेला जगभर नेण्यासाठीच्या क्रियेला बाळस धरू लागलं आहे. दर महिन्याला याच गावचे सरपंच पुत्र तथा ग्राम पंचायत सदस्य, संतोष पाटील यांनी कमीत कमी दोन कार्यक्रम आयोजित करायची, आणि यासाठी वेगवेगळ्या विषयातील तज्ञ, शासकीय अधिकारी,पर्यटक, कसे हजर राहतील, त्यांच्या कडून येरगी ग्रामस्थ यांचं परबोधन करीत,जीवनमान कसे उंचावेल याचा सातत्याने प्रयत्न चालू आहेत.
येरगी ग्रामस्थापैकी बहुतांश शेतकरी, त्यात हे गाव कृषीप्रधान , तेलंगणा,कर्नाटक सीमेवरील. याच वैशिष्ट्ये हेरून , नांदेड येथील कार्यरत रुरल फिल्म क्लब यांच्या समन्वयाने, साऊथ सिनेमा मध्ये सुप्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती निर्मित , कदैसिवी विवसाई द लास्ट फार्मर.... शेवटचा शेतकरी, सन २०२२ च्या उत्तरार्ध रिलीज झालेल्या सिनेमाचं प्रोजेकशन करण्याचं ठरलं.
आतापर्यंत आपण शेतकरी व त्यांचे प्रश्न याच अनुषंगाने चित्रपटांकडे पाहत आलो. अगदी अलिकडच्या काळातील मराठी सिनेमांनी तर हाच धोपट मार्ग चोखंदळला. शेतक-यांना सिंपथी कशी मिळेल या कडे या सिनेमांचा बाज होता. परंतू शेतीचे काही प्रश्न आहेत, जमीनीला जिवंत राहण्यासाठी करावी लागणारी जिद्दोजेहद, द लास्ट फार्मर अर्थात शेवटचा शेतकरी यांत मांडली आहे. विषयाचा बाज शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात सिनेमा यशस्वी झाला आहे.
सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक, सिनेमोटोग्राफर या तिहेरी भूमीकेत एम. मनिकंदन. अतिशय साध, सरळ व्यक्तिमत्व. ग्लॅमर जगतापासून दुर. असलेला दिग्दर्शक.
या चित्रपटासाठी पहिल्यांदा दक्षिणेतला सुपरस्टार रजनिकांत यांना मुख्य भूमिकेकरीता विचारणा करण्यात आली. त्यांनी नकार दिला. त्यातच संगीत देण्यासाठी ईलायराजा या प्रसिध्द संगीतकारासोबत करार देखील झाला. पण माशी कुठेतरी शिंकली आणि ईलायराजा यांनी या सिनेमातून अंग काढून घेत न्यायिक लढाई देखील, एम.मनिकंदन यांना लढायला लावली. शेवटी कॉम्प्रमाईज करावं लागलं जे व्हायचं ते झालं आणि वादावर पडदा पडला. याच देखील साऊथ वाल्यांनी छानस मिर्चमसाला लावत चर्वण केल! तो भाग वेगळा!
यात मदतीला आला तो ओटीटी वर आज रोजी गाजत असलेला महाराजा सिनेमाचा हिरो..'विजय सेतूपती'. निरागसतेने हा सिनेमा ओतप्रोत भरला आहे. विजय सेतूपती च्या छोट्याश्या रोल मध्ये अध्यात्माची उच्च पातळी गाठली आहे.
या चित्रपटचा दिग्दर्शक,एम.मनिकंदन हे विषयाशी ईमानदार असलेला दिग्दर्शक. साधारण लोकांच्या अवतीभोवती गुंफणाऱ्या कथेचा बाज. काका मुत्तई, कुट्टरामे थंडानई किंवा आंदावन कट्टलाई, या सिनेमांचा थाट असाच.
सिनेमा काय आहे.- शेवटचा शेतकरी-
आंध्र कर्नाटक तामिलनाडू या दक्षिणेतील मध्यभागातील ग्रामीण बाज असणारी कथा. सिनेमाची सुरुवात ग्रामीण भागातील दैनंदीन गतिविधींच्या नोंदी टिपत, हळुवार पुढे पुढे सरकत जाणारी कथा. कथेतील मुख्य पात्र ऐंशी वर्षांचा काटक शेतकरी मायांडी. त्यांच्या वयाच्या मानाने त्यांच्या हालचाली, त्यांच्या दैनंदिन सामान्य जगण्यात आधूनिकता कुठेच दिसत नाही. वीज,मोबाईल,यंत्र यांच्या त्यांच्या जगण्यावर कुठेच प्रभाव पडलेला दिसत नाही. या जीवन शैलीपुढे तरुण पिढी देखील आश्चर्य चिकीत दिसून येते.
ग्रामीण जीवनशैलीतील इतर पात्र त्यांच्या वैयक्तिक स्वप्नांचा पाठपूरावा करत असताना होणाऱ्या अगदी निरागस गंमती जमंती दिग्दर्शकाने टिपल्या आहेत. टकल पडलेला तरुण, केस उगविण्यासाठी करीत असलेली धडपड, गावातील बुटकी अविवाहीता, लग्नासाठी करीत असलेले तिचे प्रयत्न, किंवा पोलीस कॉन्सटेबल, स्वतःला पोलीसवाला आहे सिध्द करुन देत असताना करीत असलेल्या करामती! अगदी सहज साध सरळ धाटणीच चित्रण.
विजय सेतूपती यांनी रामय्या ची भूमीका निभाविताना, कॅरेक्टर च्या मानसिक स्थिती अगदी बेमालून रंगवली आहे. प्रियसी च्या मृत्यु पश्चात, ती अजून जिवंत आहे, सोबत आहे, ही आध्यात्मिक पातळी अगदी वरच्या पातळीवर नेण्यात यश आले आहे. सतत दोन वस्तू खरेदी करने, आध्यात्मिक लोकांच्या सानिध्यात रहात, प्रेमाची मुरगण भक्तिची थेअरी सुरेख सादर केली आहे. सिनेमात मागावून घेतलेली भूमीका, आणि त्यासोबत केलेला न्याय! मोठी प्रतिमा असताना देखील सहोयगी भूमीकेत कसं राहावं यासाठी हा सिनेमा पाहावा.
सिनेमाची सुरुवात होते मायांदी च्या दिनचर्येने. शहरीकरणा पासून दुर असलेल्या ग्रामीण भागाचे लोभस, वाहत्या पाण्यासारख्या नितळ असे जगणे कॅमेरामध्ये बंदीस्त करण्यात यश एम.मणिकंदन यांना आले आहे. त्यासाठी हा सिनेमा पाहावा. अस आवाहन चित्रपट सुरू करण्यापूर्वी आयोजकांनी केला.
वैश्विकरणावर केलेल भाष्य, चित्रबध्द कसं करावं, यासाठी दक्षिणेतला विनोदी अभिनेता योगी बाबू याची भूमीका पाहण्यासारखी आहे. भूसंपादनाच्या मिळालेल्या पैशांचा अपव्यय, हत्ती विकत घेवून कसा केला गेला याचं मार्मिक चित्रण पाहण्यासाठी हा सिनेमा पाहावा.
आपल्या परंपरांना न विसरता, तुमच्या मुळ अस्तित्वाला हादरा देत सिनेमा हळु हळु पुढे सरकत जातो. इंटरवल नंतर अनेक सिनेमे दम तोडतात. पण पुढे काय असेल, ही उत्सुकता शेवट पर्यंत टिकविणे, यथार्थवाद ते अतियथार्थवादाचे एक आकर्षक संयोजन पाहण्यासाठी हा सिनेमा पाहावा.
एम मनिकंदन यांचा हा चौथा चित्रपट. सत्यजित रे यांच्या मानवतावादी यथार्थवादाशी निगडीत सिनेमांच्या जवळ, दिग्दर्शक एम.मनिकंदन यांची कलाकृती नेऊन ठेवते. निसर्गाची एकरुपता दर्शविताना, मोर,पक्षी, त्यांचा आवाज, यांचा बेमालूम वापर, याचा विचार सिनेमा पाहताना अनुभवावा, शेती आणि मोर पक्षी यांच नात ऑरगॅनिक शेतीप्रेमींनी निश्चीतच तपासावं. वर्तमानाचं भान सिनेमा कुठे सोडत नाही.न्याय पालीका, न्याय प्रणाली, पोलीस प्रशासन, रासायनिक शेती, यात भरडणारी अति सामान्य जनता यावरील केल गेलंलं चित्ररुपी भाष्य निश्चितच पाहावं.
पुर्वग्रह, मानसिकता, एखाद्याच्या आयुष्यात काय घडवू शकते, प्रशासनिक अंगाने न्याय निवाडाकरताना इंन्टेशन्स काय असावेत, याच टिपन या अँगलने देखील सिनेमा पाहावा.
केवळ दोन कॅमरांचा वापर करीत ९५ दिवसांच्या कालावधीतील चित्रण पुर्ण करीत सिनेमा तयार केला गेला आहे. कंटाळवाणे व्याख्याने न देता महत्त्वाच्या गोष्टींबद्दल कसे बोलावे याचे एक सुंदर उदाहरण. हवेचा खोल श्वास -- इच्छापूर्ती आणि ताजेतवाने होण्याची अनुभूती देणारा सिनेमा. शेती विषय़क वास्तविक मांडताना मायंडी च्या भूमीकेतील नलांडी यांनी भूमिकेला दिलेला न्याय निश्चीतच संस्मरणीय ठरतो. तिनशेच्या जवळपास कलाकारांमध्ये अदमासे ५० कलाकार सिनेमा माहित असलेले, त्यात ०२ स्टार कलाकार. एवढ्या मोठ्या कलाकारांच्या टिम ला चैनई येथे नेऊन साऊंड रेकॉर्डींग करता येणे शक्य नव्हत. Sync साऊंड प्रणालीने स्प़ॉट रेकॉर्डींगचे तंत्र निश्चतच अनुभवावं.
सिनेमा प्रदर्शन होताना तो तेलगू भाषेत दाखविण्यात आला, त्याचा परिणाम हा 250 प्रेक्षक ज्यात ग्रामस्थ विशेष करून महिलांचा सहभाग यांनी भर थंडीत जागा न सोडता अनुभवला.
या चित्रपटातील मुख्य पात्र नलांडीजींना
२०२३ मध्ये या सिनेमांचे मुख्य पात्र मायंडी म्हणजेच नलांडी यांच निधन झालं. सिनेमा संपल्यानंतर
मायंडी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.





Social Plugin