संदिप गावडे @ प्रतिनिधी
येवलेवाडी ता. वाळवा येथे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार शिबिर आयोजित केले. यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी देवराज पाटील म्हणाले, या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव तर मिळतोच, शिवाय श्रम संस्कार शिबिरातून स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबविले जात आहे. नागरिकांनी देखील यातून स्वच्छतेचा वसा घेऊन गाव नेहमी स्वच्छ ठेवावे. तरच आरोग्य व सामाजिक समतोल राहिल.
यावेळी लोकनियुक्त सरपंच पुनम जगताप, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये राजारामबापू दूध संघ संचालक पोपटराव जगताप, उपसरपंच मयूर जगताप, पोलीस पाटील अरविंद जगताप, ग्रामपंचायत सदस्य संतोष जगताप, पांडुरंग जगताप, राजेंद्र जगताप इत्यादी मान्यवरांसह राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम प्रमुख रेखा पासाले, डॉ. तेजस्विनी डांगे, प्राचार्य के मानेसर आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य माने सरांनी गावातील विकासासाठी स्वच्छता व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाने हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी स्वागत सरपंच पूनम जगताप यांनी तर आभार प्रा. कल्याणी नाईकवडी यांनी मानले.





Social Plugin