Ticker

6/recent/ticker-posts

मराठी साहित्याचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे .... प्राचार्य डॉ. जितेंद्र कदम

 


बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे] 

मराठी भाषेला फार प्राचीन परंपरा असल्यामुळेच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला भाषा संस्कृती रूढी परंपरा जपत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत चांगल्या साहित्यकृतीचे वाचन केले पाहिजे तसे प्रतिपादन खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.जितेंद्र कदम यांनी केले.

पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालय आणि मराठी विभागाने आयोजित केलेल्या 'मराठी भाषा गौरव दिन' कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले, मराठी विभाग प्रमुख, प्रा. एच‌.जी.निमसे, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद, प्रा.डॉ.एस.आर.क्षीरसागर  प्रा.डॉ.ए .एस.जगताप प्रा.ए.टी. खाडे ,प्रा.एस.डी.वाघमारे, प्रा. सी.एम.जठार इत्यादी उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात डॉ. जितेंद्र कदम म्हणाले,' कविवर्य कुसुमाग्रज  तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. आपल्या सर्व साहित्य प्रकारांमधून मानवी जीवनमूल्ये मांडली आहेत. तसेच मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या जडणघडणीत 

महत्वाची भूमिका बजावली आहे. ते कवी, कथाकार, नाटककार, कादंबरीकार, समीक्षक होते. त्यांच्या कार्याच्या गौरवासाठी २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.अनेक साहित्यिकांच्या लेखनाने मराठी भाषा समृद्ध झाली. याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ .आर पी. भोसले म्हणाले ,' मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी प्रमाण भाषेबरोबर बोलीभाषांचाही अभ्यास केला पाहिजे मराठी भाषेचा संशोधनासाठी बोलीभाषेत खूप संधी आहेत. व्यवसायाच्या विकासासाठी  भाषेच्या माध्यमातून उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करावी लागतात. मराठी भाषा ज्ञानाबरोबर परकीय भाषेतील ज्ञान समजून घेऊन लेखन, वाचन, संवाद केले पाहिजे. याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी  विभाग प्रमुख प्रा.एच.जी.  निमसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एम .एन.आवळे यांनी केले. तर आभार प्रा.ए.के.देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक,विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.