कृष्णा पवार @ग्रामीण प्रतिनिधी नाशिक
पेठ - ग्रामीण रुग्णालय पेठ* याठिकाणी
मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे साहेब व डॉ.वैद्यकीय अधिक्षक समाधान पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.12 फेब्रुवारी 2025 रोजी कर्करोग म्हणजे काय, कर्करोगाचे लक्षणे, प्रकार व उपचार पद्धती बाबत रुग्णांना मार्गदर्शन केले, वैद्यकीय अधिक्षक यांनी मौखिक कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोगाविषयी महिती दिली तसेच आधीपरिचारिका मंजना दराडे यांनी स्तनाचा कर्करोग या विषयी महिती दिली. समुपदेशक श्री दिलीप देशमुख यांनी कर्करोगाची लक्षणे व कारणे, तसेच आपली बदललेली जीवन शैली, व्यसनाधीनता या विषयी माहिती दिली. कर्करोगाविषयी जनजागृती करत तंबाखू मुक्तीबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी श्री. आनंद सपकाळ वाघेरे सर बोराडे सर डॉ नागेश सर पंकज वाघ सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.
सर्व रुग्णांना नाशिक हुन आलेल्या टिम तर्फे स्तनचा कर्करोग गर्भासय कर्करोग तोंडाचा कर्करोग यांची तपासणी करण्यात आली





Social Plugin