बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई व अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पुणे यांच्या विशेष सहाकार्याने राज्यातील 43 कारागृहात बंदिस्त असलेल्या बंदयांमध्ये “राष्ट्रप्रेम” जागृत करणाऱ्या तसेच बंदयांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या प्रबोधनात्मक स्वरूप असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन दि. 25 मार्च रोजी एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्वच कारागृहांमध्ये करण्यात आला.
सातारा जिल्हा कारागृहामध्ये संस्कृती, राष्ट्रप्रेम व देशभक्ती जागृत करुन त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी "जीवन गाणे गातच जावे” या माध्यमातून देशभक्ती, संस्कृती आणि प्रबोधन" या प्रबोधनात्मक स्वरुप असणाऱ्या कार्यक्रमाचे यांचेकडून आयोजन करण्यात आलेले होते.
या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. कारागृहाचे ब्रिदवाक्यानुसार देशभक्तीपर, संस्कृतीदर्शक, सामाजिक व प्रबोधनात्मक गीत गायन इत्यादी कलागुणाच्या माध्यमातून कारागृहातील बंदयांकरीता मनोरंजनातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, संस्कृती व भक्तीभाव या कार्यक्रमाच्या माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सदर “जीवन गाणे गातच जावे” हा कार्यक्रम मा. डॉ. श्री. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे, मा. डॉ. श्री. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक व मा. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कारागृहात बंद्यांकरीता घेण्यात आला.
या कार्यक्रमास गायक वंदना धर्मेंद्र कांबळे, मिलिंदकुमार शांताराम कांबळे, अँकर विजयकुमार यशवंत गायकवाड, वादक विजय रमेश वाडेकर, अमोल बाळकृष्ण वाघ, आकाश बाळकृष्ण शिंदे, साऊंड (सातारा) प्रवीण विजय जाधव, अनिल बाबुराव पवार तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार वाघेश्वर गरुड, दारकू पारधी, शिपाई संदीप भांगरे, सागर मासाळ, राकेश पवार, चेतन शहाणे, प्रतीक्षा मोरे, ज्योती शिंगरे, रूपाली नलवडे, प्रशांत कदम चांद पटेल तसेच वरिष्ठ लिपिक हेमंत यादव, नानासो डोंगळे, गणेश सुळ इत्यादी उपस्थित होते.





Social Plugin