Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांसाठी समाजाचा हातभार–घोंसी खुर्द येथे शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न



 अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोंसी खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रमातून जमा झालेल्या देणगीतून विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून,समाजातील दातृत्वाची आणि शिक्षणावरील प्रेमाची जाणीव प्रकर्षाने दिसून आली.

शाळेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शालेय समिती अध्यक्ष श्री प्रकाश शेंबडे उपाध्यक्ष श्री रामेश्वर बुधनर सरपंच श्री राजेश बुधनर तसेच ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक वजीर शेख नारायण बुधनर गंगाधर माने गजानन शेंबडे महेंद्र राऊत दत्ता राऊत उपस्थित होते याशिवाय शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास मुळक शिक्षिका श्रीमती संध्या वाळके श्रीमती उर्मिला झांजे तसेच शिक्षक श्री. हनुमान पालकर, श्री. ज्ञानेश्वर गाढवे यांचीही विशेष उपस्थिती होती.

यावेळी बोलताना शालेय समिती अध्यक्ष श्री. प्रकाश शेंबडे यांनी समाजाने शिक्षणासाठी योगदान देण्याचे महत्व सांगितले. "विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळा आणि समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल"असे ते म्हणाले.

मुख्याध्यापक श्री विलास मुळक यांनी आपल्या भाषणात सांस्कृतिक कार्यक्रमातून जमा झालेल्या निधीचा योग्य वापर करत विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या शाळेच्या भूमिकेवर प्रकाश टाकला."या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज मिळू शकले.समाजाच्या सहकार्याने आम्ही भविष्यातही असेच उपक्रम राबवू," असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संध्या वाळके यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जमा झालेल्या निधीचा योग्य वापर करत विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या शाळेच्या भूमिकेवर प्रकाश टाकला."समाज आणि शाळेच्या एकत्रित प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होते.यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो," असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. ज्ञानेश्वर गाढवे यांनी केले. विद्यार्थ्यांनी नवीन दप्तर मिळाल्याने आनंद व्यक्त केला आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

शालेय विकासासाठी ग्रामस्थांचा असा सहभाग हा निश्चितच प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्थानिक लोक,शिक्षक आणि पालकांनी अशीच एकजूट कायम ठेवावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 One attachment

  •  Scanned by Gmail