आष्टा /प्रतिनिधी
येथील आष्टा ग्रामीण रुग्णालयाला स्वरांजली डायग्नोस्टिक सेंटर यांचेकडून शिवजयंती निमित्त व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.यावेळी रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ सचिन भंडारे यांनी आष्टा परिसरातील ग्रामीण रुग्णायालामध्ये वयोवृद्ध, अपंग रुग्णांची होणारी कसरत पाहून रेडिओलॉजिस्ट डॉ. शशिकांत माने यांनी व्हीलचेअर भेट दिली. त्याबद्दल त्यांचे आभारही त्यांनी मानले.
तर डॉ. शशिकांत माने म्हणाले, आष्टा परिसरातील लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या हेतूने शिवजयंतीचे औचित्य साधून ही भेट देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड, सहायक अधीक्षक संभाजी कोळी यांचेसह इतर रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





Social Plugin