राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया गुरुवारी दिग्रस तालुक्यात राबविण्यात आली. 55 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यातील 28 जागा महिला सरपंच यासाठी आरक्षित करण्यात आल्या ही संपूर्ण प्रक्रिया राबविताना ईश्वर चिट्ठी आणि थेट प्रक्रिया राबविण्यात आली.
दिग्रस तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशान्वये सन 2025 ते 2030 करिता 24 एप्रिल तहसील कार्यालय दिग्रस येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामाप्र व सर्वसाधारण महिला सह आरक्षण करण्यात आले. दिग्रस तालुक्यातील आरक्षण 2025 ते 2030 पर्यंत आरक्षित करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती करिता देऊरवाडा पु. मांडवा, विठाळा, सावंगा यापैकी महिला आरक्षण मांडवा, सावंगा बु साठी करण्यात आले. तसेच अनुसूचित जमातीसाठी वाईलिंगी, वाई,काठी,मोख, साखरा, कलगाव आष्टा,सेवानगर यापैकी महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती वाई लिंगी, साखरा,कलगाव,आष्टा नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित ग्रामपंचायत आरंभी, झिरपूरवाडी, धानोरा बू.,हरसुल महागाव, वडगाव, ईसापुर,साखरा,फेटरी,तूपटाकळी,चीचपात्र, वसंतनगर, चिरकुटा, फुलवाडी यापैकी महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती आरंभी, धानोरा बु., हरसुल,वडगाव,ईसापूर,साखरी, चिंच पात्र,सर्वसाधारण साठी आरक्षण ग्रामपंचायती तीवरी, धानोरा बू., अमला बु.,शिवनी,खेकडी,चिंचोली क्र. एक, खंडापूर,रोहणादेवी, कळसा, रामनगर, डेहनी, लाख रा., बेलोरा, लोणी,वाईमेंढी,माळहिवरा,डोळंबा सिंगद, रुई तलाव, रुई मोठी, वसंतपूर, खर्डा,रहाटी, विठोली, मरसूळ, पेळु,कांदळी, वरंदळी, सावंगा बु., निंबा यापैकी महिला आरक्षित ग्रामपंचायती तिवरी, धानोरा बु. खेकडी, खंडापूर, रोहणादेवी, कळसा, रामनगर,माळहिवरा, डोळंबा, सिंगद, रुई तलाव,राहटी, मरसूळ,पेळू, लिंभा आशा आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया दिग्रस च्या तहसील सभागृहात राबविण्यात आली. यावेळी तहसीलदार मयूर राऊत, निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यासह अनेक गावचे पुढारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin