*#खा.डॉ.अजित गोपछडे यांचा येरगी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा संपन्न#**@बालिका पंचायत राज समितीच्या सर्व बालकांना स्वखर्चाने संसद दाखवणार@*
देगलूर: देगलूर तालुक्यातील येरगी हे गाव चालुक्य कालीन ऐतिहासिक वारसा असलेलेल गाव असून येथे असलेल्या चालुक्य कालीन सरस्वती मंदिराचे जीर्णोद्धार करून त्याचे भव्य मंदिरात रूपांतर करणार असल्याची घोषणा राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी केली.
देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन नगरी येरगी येथे काल 24 एप्रिल रोजी ग्राम पंचायत कार्यालय,महिला बचत गट आणि बालिका पंचायत राज समितीच्या वतीने राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सत्कारमूर्ती म्हणून खासदार डॉ.अजित गोपछडे हे व्यासपीठावरून बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की येरगीची देशपातळीवर ओळख होण्यासाठी गावचे सरपंच संतोष पाटील,ग्रामस्थ आणि बालिका पंचायत यांचे कार्य उल्लेखनीय असून या गावचा विकास पाहून मी सुद्धा या गावाच्या प्रेमात पडलो आहे. गावच्या विकासासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी राहणार असून येरगी ही गाव दत्तक घेणार असल्याची घोषणा ही यावेळी त्यांनी केली.
सायंकाळी 7 वाजता गावात प्रवेश करण्या अगोदर खासदार डॉ.अजित गोपछडे यांचा गावातील महिलांच्या वतीने ओवाळणी करून त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर वाजत गाजत त्यांना गावात सन्मानाने नेण्यात आले. यावेळी त्यांच्या आगमन प्रीत्यर्थ गावात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर प्रथम प्राचीन सरस्वती मंदिरात जाऊन तिथे पूजा अर्चना करण्यात येऊन आरती करण्यात आली.
त्यानंतर गावातील आयोजित सन्मान सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यात आले. यावेळी आयोजित सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड हे उपस्थित होते तर सत्कारमूर्ती म्हणून खासदार डॉ.अजित गोपछडे,प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर,माजी सभापती माधवराव मिसाळे गुरुजी,अशोक साखरे,माजी तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर,माजी सरपंच बसलिंगपा सुलपुले,अनिल कमटलवार, अशोक डुकरे ,संतोष आगलावे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले. प्रास्ताविकातून मागील दोन वर्षात येरगी मध्ये केलेल्या विकास कामाचा आढावा दिला.
तत्पूर्वी सत्कारमूर्ती खासदार डॉ.अजित गोपछडे यांचा येरगी ग्राम पंचायत,बालिका पंचायत राज आणि महिला बचत गट यांच्या वतीने वही व पेन देऊन सन्मान केला. तसेच उपस्थित पाहुण्याचे सुद्धा वही पेन देऊन सन्मान करण्यात आला.
सत्कारानंतर मार्गदर्शन करताना डॉ.अजित गोपछडे म्हणाले की सरस्वतीच्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याबरोबर येरगीला तिन्ही राज्यातून जोडल्या जाणाऱ्या रस्त्याचे काम जलद गतीने सुरू करण्याचे अभिवचन दिले. याच बरोबर गावात विविध सभा,कार्यक्रम घेण्यासाठी एक मोठा सभागृह बांधण्यासाठी लवकरच निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ.अजित गोपछडे यांनी येरगी गावातील विकास कामाची स्तुती करत असतानाच बालिका पंचायत राज समितीच्या कार्याची दखल घेत त्यांना स्वखर्चाने दिल्लीचे संसद व संसदेतील कार्य कसे चालते हे दाखवणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की देगलूर तालुक्यातील अगदी तेलंगणा कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या येरगी गावात एक तरुण सरपंच ,बालिका पंचायत राज आणि ग्रामस्थ मिळून दारू बंदी करतात म्हणजे गावाने खऱ्या अर्थाने विकास साधत असल्याची खूण आहे असे म्हणाले.
गावात मुख्य रस्त्याचे सीसी रोडचे उद्घाटन सुद्धा यावेळी खासदार अजित गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले की खऱ्या अर्थाने गावाचा विकास साधायचा असेल तर सर्वांनी ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी नुकतेच काश्मीर येथील पहलगाम येथे आतंकवाद्यांच्या क्रूर हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सायंकाळी 7 ते रात्री 9.30 पर्यंत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात गावातील शेकडो महिला पुरुष,बालक,बालिका,युवक युवती उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय आमटे यांनी केले तर आभार बालिका पंचायत राज समितीच्या सचिव महादेवी दाणेवार यांनी केले.
Social Plugin