Ticker

6/recent/ticker-posts

बालचिमुकल्यांच्या कलेवर बक्षिसांचा वर्षाव,



बुध जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात; रक्कम शाळेला सुपूर्द


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

बुध ता . खटाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात स्नेहसंमेलनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. या वेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. या वेळी उपस्थितांनी हजारो रुपयांची बक्षिसे देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला.

बुध येथील शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने झाली. त्यानंतर शाळेतील इयत्ता पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदनासह विविध समाज प्रबोधनात्मक गीते मराठी मिक्स, मंगळगोर , सावित्रीबाई फुले , खंडोबा गीत  , गोलमाल रेन डान्स रिल्स 

, दिंडी , फनी डान्स , लिखोगे पढेगो , शिवकन्या , रेट्रो , छावा , बॉलीवूड मिक्स , , लावणी , ११ मारूती दर्शन  , पाळणा , आपली यारी पुष्पा तानाजी मालुसरे  , व   देशभक्तिपर गीतं या बहारदारगीतासह या बालकलाकारांनी सादर केलेल्या विविध कलागुणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक गाण्यास उपस्थित पालक, ग्रामस्थांनी टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद देत रोख बक्षिसांचा वर्षाव झाला. हजारो रुपयांची रक्कम शाळेकडे सुपूर्द केली. प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन  पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनि  संदीप पोमन  यांच्या हस्ते झाले . यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ . सौ . प्रियाताई शिदे यांनी विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . या वेळी सरपंच सौ. सुजाता बोराटे , उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , खटाव तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश राजेघाटगे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन सुतार , माजी प्राचार्य के.डी. पवार  गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते  , विस्तार अधिकारी संगिता गायकवाड , चंद्रकांत सुतार , केंद्र प्रमुख अजित निकाळजे  , नितीन खोत , संजय दिडके , माजी केंद्र प्रमुख  प्रमोद जगदाळे , एस .के. जाधव , विठ्ठल फडतरे ,   बुधगावातील आजी -माजी ग्रामपंचायात सदस्य , विविध संस्थाचे पदाधिकारी , ग्रामस्थ ,. माहिला , युवावर्ग , पालक मोठया संख्येने  उपस्थित होते .  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन सुतार  , उपाध्यक्ष श्रद्धा पवार , स्नेहल जगदाळे  , सुमित कुंभार  ,  सुप्रिया शेंडे , विकास सुतार दयानंद जगदाळे , अंजुम मोमीन , किर्ती बल्लाळ , हुसेन पठाण , शितल खराटे व   मुख्याध्यापक  जयवंत घाडगे , माधुरी नलवडे ,जितेंद्र जगताप, दतात्रय जाधव, दमयंती अब्दागिरे, उमा रणसिंग, दीपाली घनवट, नितीन घनवट, अनिता मोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल कोळी यांनी केले .आभार दत्तात्रय जाधव यांनी मानले .