Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.दिलीप चव्हाण सर मानवधिकार व आरक्षण या आंतरराष्ट्रीय परिषदेतकरीता विदेश दौऱ्यावर.



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

   श्री भायजी महाराज माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक प्रा. दिलीप बाबुशिंग चव्हाण यांची बँकॉक युनिव्हर्सिटी थायलंड येथे मानवधिकार व आरक्षण या विषयावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता निवड झाल्याबद्दल प्रा. श्री डी.बी. चव्हाण यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला व विदेश दौऱ्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सेवादास शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय अशोकभाऊ हिरासिंग राठोड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री जगन्नाथ जी गावंडे साहेब व संस्थेचे सहसचिव श्री बि.जे. राठोड सर यांची उपस्थिती होती. 

विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री के. डी. चव्हाण सर यांनी अभिनंदन केले व विदेश दौऱ्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.