Ticker

6/recent/ticker-posts

फार्मसी मॅनेजमेंट कोर्स एक दिवशीय प्रशिक्षण शिबिर.



प्रतिनिधी :निरंजन बावस्कर 

भोकरदन: येथील गुरुकुल कॉलेज ऑफ फार्मसी नांजा रोड भोकरदन येथे फार्मसी मॅनेजमेंट कोर्स एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडले.

    त्यावेळी जिल्हा केमिस्ट संघटनेचे जालना जिल्ह्याचे अध्यक्ष साईनाथ दादा पवार जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ शेळके, व किरण शेठ बावस्कर  हे उपस्थित होते आणि फार्मसी कौन्सिलच्या वतीने प्राचार्य विठ्ठल कुचे सर आणि भोसले सर यांनी उपस्थित फार्मासिस्ट  बांधवांना एलईडी स्क्रीन वरती सेशन वाईज मार्गदर्शन केले , च्या मार्गदर्शनामध्ये आपला बिजनेस कशा पद्धतीने वाढवता येईल कुठल्या गोष्टी आपल्याला कस्टमर सोबत कशा पद्धतीने काउन्सिलिंग करायचे आहे याची  माहिती दिली  आहेत व बिझनेस प्रोग्रेस करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या टिप्स फार्मासिस्ट

यांना सांगितले. त्या अनुषंगाने भोकरदन येथील  60 च्या जवळपास फार्मासिस्ट उपस्थित होते यावेळी भोकरदन तालुका अध्यक्ष नरेंद्र आंधळे ,  अनिल दळवी , नामदेव जगताप यांनी परिश्रम घेतले.