डॉ. गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा : यवतमाळ येथून देवदर्शनासाठी शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाले. ही घटना १० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, एमएच २९ बीसी २५६५ क्रमांकाची एक कार घेऊन चौघे यवतमाळ येथून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यांचा समृद्धी महामार्गावरील धनज बुद्रुक पोलिस स्टेशनच्या हद्दीतून प्रवास सुरू असताना त्यांच्या वाहनासमोर धावणाऱ्या बोलेरो पीकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे भरधाव वेगात धावणारी कार अनियंत्रित होऊन या पिकअपवर धडकली. ज्यात कार चालक मंगेश (पूर्ण नाव कळू शकले नाही) व
विक्रम अशोकराव सौरगपते वय ४० रा. यवतमाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुकूल मनोज यादव वय ३५ रा.दत्त चौक यवतमाळ व मयूर दीपक डोनाडकर वय २९ रा.दत्त चौक यवतमाळ हे गंभीर जखमी झाले. घटनेची सर्वप्रथम माहिती रुग्णसेवक गौरव ठाकरे यांनी रुग्णसेवक गजानन करडे यांना माहिती दिली त्यांना तात्काळ अपघताचाची माहिती श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख ते तात्काळ घटना श्री रवाना होण्यासाठी निघाले व सोबतच टोल प्लाजा कारंजा समृद्धी महामार्ग 108 रुग्णवाहिकेचे पायलट सोनू शिंदे डॉ राठोड व शिवनी 108 पायलट गोपाल रोहनकर या तिन्ही रुग्णवाहिका यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याची सांगितले तातडीने त्यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह व जखमींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे कर्तव्यावरील जखमींनी त्यांच्यावर उपचार केले . त्यावेळी कारंजा टोल प्लाजा अग्निशामक दल समृद्धी महामार्ग व अग्निशामक दल शिवनी टोलबाजार हे प्रामुख्याने मदतीसाठी उपस्थित होत्या.





Social Plugin