पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
कारंजा (लाड )सीमेवर जाण्यापूर्वी येथील एका सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने रक्तदान करून समाजापुढे नवनवा आदर्श उभा केला आहे. लोकमान्य शाळेच्या व्यायाम शतक महोत्सवानिमित्त व आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनानिमित्त येथील स्टेट बँक येथे ११ मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये येथील सीमा सुरक्षादलात (बीएसएफ) कार्यरत असलेले कारंजापुत्र अतुल कुर्हक हे सुटीवर गावाकडे आले होते.
मात्र पाक-भारत सीमेवर गेल्या चार दिवसापासून भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांची सुट्टी रद्द होऊन त्यांना तातडीने गुजरातमधील भूज या सीमावर्ती भागात रुजू होण्याचा आदेश असल्याने ते तातडीने जाणार आहेत. मात्र सेवेवर निघण्यापूर्वी त्यांनी आज रक्तदान करून नवीन आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या या दातृत्व भावनेने उपस्थितांमध्ये कुतूहल मिश्रित सामाजिक जाणीवेचा भाव निर्माण झाला. यावेळी आमदार सईताई प्रकाश दादा डहाके यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला
Social Plugin