पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
कारंजा(लाड )येथील दिवंगत माजी आमदार प्रकाश दादा डहाके यांचे १० मे रोजी तृतीय पुण्यस्मरण होते. त्यानिमित्त असंख्य समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
स्व. माजी आमदार प्रकाश दादा डहाके यांचे १० मे २०२२ रोजी आजारपणामुळे आकस्मिक निधन झाले होते. तत्पूर्वी, त्यांनी आमदार म्हणून कारंजा विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले होते. शिवाय कारंजा बाजार समितीच्या सभापतीपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यामुळे कारंजा आणि मानोरा मतदार संघात त्यांचा आजही मोठा चाहता वर्ग आहे. १० मे रोजी तृतीय पुण्यस्मरणानिमित्त असंख्य समर्थकांनी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी समर्थकांनी आमदार सईताई डहाके, देवव्रत डहाके, कौस्तुभ डहाके, तेजस्विनी डहाके यांच्याशी संवाद साधला. यातून स्व. प्रकाश दादा डहाके यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या आठवणीत गहिवरले होते. अनेकजण दरम्यान, माजी आमदार स्व. प्रकाश दादा डहाके यांच्या पुण्यस्मरणनिमित्त त्यांच्या कुटुंबियांकडून दरवर्षी सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवले जातात. पण यावर्षी भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. तथापि, येथील स्व. प्रकाश दादा वनपर्यटन केंद्र आणि ऋषी तलाव परिसरात आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, बाजार समितीचे संचालक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तथा डहाके समर्थक उपस्थित
Social Plugin