Ticker

6/recent/ticker-posts

दिग्रस सह ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई



राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस पासन फक्त 8 कि.मी.अंतरावर यवतमाळ जिल्ह्यातील सर्वांत मोठा अरुणावती सिंचन प्रकल्प आहे, दिग्रस पासुण फक्त 8 कि.मी.वरच ,योगा योगाने नांदगव्हान धरण आहे. जे नगर परीषदेच्या मालकीचे आहे.आपल्या राज्यात दिग्रस व अचलपुर असे दोनच शहरे आहे.जेथे नगरपरीषदेच्या मालकीची धरणे आहे.नांदगव्हाण धरणा वरुण सायपन पध्दतीने दिग्रस पर्यंत पाणी पोहचते.विना विजेचे ,पंरतु नियोजनबद्ध नियोजना अभावी व तांत्रीक दोषयुक्त प्रणालीमुळे दिग्रस करांनां क्रुत्रीम पाणी टंचाई चां सामना करावा लागत आहे.

10__10 दिवस तर कुठे 12_12 दिवस नळाला पाणी येत नाही.हे बहुधा जगातील एकमेव आश्चर्य ठरु शकते.अर्थात विहीर जवळ असुणही घसा कोरडा.रोटी, कपडा और मकान या मुलभुत गरजा पेक्षा पाणी ही सर्वांत मोठी गरज आहे.चारी जगाचा स्वामी पाण्याविना भिकारी.म्हण्याची वेळ आज में महीन्याचे रखरखत्या तापमानात दिग्रसकरांन वर ओढवली आहे.नां कोणते मोठे उद्योगधंदे नां शेताचे ओलीत मंग दिग्रसकरांचे हक्काचे पाणी कुठं मुरतेय.अरुणावती प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा काय पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवला आहे.दुरुण या पाणी साठ्याकडे पाहा व आपली तुर्षणा भागवा.येथुन मानोरा,मंगरुळ,वाशीम,आर्णी,दारव्ह्याला पाणी चालल्याच्या वलग्णा केल्या जातात.व जेथे एवढे मोठे अरुणावती धरण आहे.

तेथे पाण्यासाठी टाहो सुरु आहे.या पेक्षा मोठी शोकांतिका कोणती.खरोखर याला दुर्दैवच म्हणावे लागेल.शासन, प्रशासन नगर परीषदेच्या शुन्य नियोजनाचा हा परीणाम आहे.अजुण दिड ते दोन महीने रखरखत्या उन्हात दिग्रसकरांची पायपीट सुरु आहे.दिग्रसच्या भिषण पाणी टंचाईची दखल राज्यस्तरीय जवळपास सर्वच वाहीन्यांनी घेतली आहे. तर शहरात अनेक भागात सदोष पाईपलाईन ही यांस जवाबदार आहे.नवीण वाढीव पाईप लाईन चे काम ही थंडबस्त्यात आहे.या वरही कोणाचे नियंत्रण दिसत नाही.थुक्याला थुका लावणे सुरु आहे.दिग्रसकरांनां मुबलक व स्वच्छ पाणी कधी मिळणार, कासवगतीने सुरु असलेली वाढीव योजना कधी पुर्ण होणार? असे अनंत प्रश्न या निमीत्ताने उभे राहिले आहे.