Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा तालुका दिअकोला - वाशीम मध्यवर्ती सहकारी सोसायटी बँक अकोला सभा संपन्न ----- शेतकऱ्यांनसाठी मोठी घोषणा जाहीर



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

  कारंजा लाड तालुक्यामधील सर्व सेवा सहकारी सोसायटी संस्थेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज दि अकोला वाशिम सेवा सहकारी बँक कारंजाला शाखेमध्ये शेतकऱ्यांच्या विविध योजनेचे महत्व याविषयी त्या सभेमध्ये मार्गदर्शन अध्यक्षांना करण्यात आले यावेळी या मार्गदर्शनामध्ये जे शेतकरी वर्ग 30 .3. 2024 पर्यंत पिक कर्ज थकीतआहे अशा शेतकऱ्यांना संपूर्ण व्याज माफ करण्यात आले व अशा शेतकऱ्यांना फक्त1 टक्के प्रोसेसिंग फी आकारण्यात आली हे थकीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे .

यावेळी विविध योजनेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये सर्वप्रथम दि अकोला वाशिम मध्यवर्ती सहकारी बँक अकोला यांनी या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर केली यावेळी अकोला येथील झळके साहेब व्यवस्थापक दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला श्री श्रीधर कानकिरड साहेब उपाध्यक्ष अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला शाखेमधील सर्व निरीक्षक वर्ग गटसचिव व कारंजा तालुका मधील सर्व सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित होते. यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली.