गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
लोकेशन क्रमांक 174 वरील घटना दि १/५/२५ प्राप्त माहितीनुसार सकाळी ११:३० सुमारास कार क्रमांक MH१९AX४५४५ही समृद्धी महामार्गावर कारंजा वरून पुलगाव येथे काही कामानिमित्त जात असताना लोकेशन क्रमांक 174 वर आयशर ट्रक ने अचानक कट मारल्याने सदर का डिवायडरवर आदळी व त्यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कारंजा 108 लोकेशन पायलट आतिश चव्हाण व डॉ भास्कर राठोड तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी रुग्णांना कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले. जखमी रुग्णांचे नाव आसरफ खान वय 32 इरफान नवरंगाबादी वय 34 रा कारंजा त्यावेळेस त्यांच्या मदतीसाठी एच एस सी टीम समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग अग्निशामक दल हायवे पोलीस हे प्रामुख्याने घटनास्थळी हजर होते .
Social Plugin