बाळासाहेब पवार प्रतिनिधी
उमरखेड दि. ३ मे २०२५ रोजी ब्राह्मणगाव येथील श्री तेजमल गांधी विद्यालय व चातारी येथील श्री शिवाजी विद्यालय येथे रोबोटिक आणि कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन व बाळ शिवाजी तंत्रज्ञान स्पंदन केंद्र स्थापन करण्यात आले.आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने वाढत आहे. बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरावर या तंत्रज्ञानाची ओळख आणि संकल्पना रुजविणे ही काळाची गरज लक्षात घेऊन, ग्रामीण भागातील शालेय शिक्षणासाठी ची पहिली अशी नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा निर्माण करून आजचा विद्यार्थी हा उद्याच्या आपल्या देशाचे भविष्य असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थी कौशल्य विकास आणि त्यावर आधारित तंत्रज्ञाना मध्ये ज्ञान संपादन करतील ते विद्यार्थी भविष्यातील स्पर्धे मध्ये टिकावे या हेतूने विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी कोणतेही शासकीय आर्थिक सहाय्य न घेता विद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने सर यांनी विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करून आज दिनांक ३ मे २०२५ रोजी या प्रयोगशाळाचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन डॉ .विजयराव माने हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते व संस्थेच्या सचिव अश्विनीताई पाटील चोंढीकर, अँड. अर्चनाताई माने, रत्नाकर मुक्कावार यांनी उपस्थिती दर्शविली. या प्रकल्पाचे उद्घाटन करून या तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची सोय श्री तेजमल गांधी विद्यालय ब्राह्मणगाव तसेच श्री शिवाजी विद्यालय चातारी येथील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दोन्ही विद्यालयातील शिक्षकांना या तंत्रज्ञानाचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण या विषयाचे युवा शिक्षण तज्ञ तथा २६ अल्फाबेट चे संस्थापक श्री अनुपजी यादव यांच्या तर्फे प्रशिक्षित करून शिक्षकांना सज्ज करण्यात आले आहे.
तसेच या कार्यामध्ये यवतमाळ येथील उबंटू विद्यालयाचे संस्थापक पांडुरंगजी खांदवे आणि या भागातील भूमी पुत्र संभाजीराव राणे यांचे सहकार्य लाभले आहे. बाल अवस्थेत सर्व गुण संपन्न असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन शाळेतील बालकांना काळा प्रमाणे गुणसंपन्न करण्यासाठी या प्रकल्पाला “बाळ शिवाजी तंत्रज्ञान स्पंदन केंद्र” असे नाव देऊन हा प्रकल्प अँड. अर्चना माने यांच्या देखरेखी खाली आणि युवा प्रशिक्षक अनुप यादव यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. रोबोटिक्स व कॉम्प्युटर लॅबचे उद्दिष्टे सांगताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख निर्माण होणे, कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाचे कौशल्य हस्तगत होणे, संगणक कोडिंग चे ज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा प्रत्यक्ष सराव होणे, न्यूट्रेसिटिकल आणि फार्मा वैद्यकीय संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे, 3D प्रिंटिंग करिता संगणकीय डिजाइन करून प्रॉडक्ट ची निर्मिती करणे हे उदिष्ट असून, संगणक व रोबोटिक्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्याची सोय शालेय शिक्षणात केल्यामुळे परिसरातील पालक लोकांकडून हा असा नाविन्यपूर्ण विद्यार्थी उपयोगी उपक्रम उभा केल्या बदल विद्यालयाचे चेअरमन डॉ. विजय माने यांचे आणि दोन्ही विद्यालयाचे संपूर्ण शिक्षक वृंद यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
"यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनगटात सळसळ करणारे बळ, कौशल्य विकासात रूपांतर करून बुद्धीमत्ते कडे हे बळ स्थलांतरित करणे ही काळाची गरज.” व डॉ.विजय माने.
तेजमल गांधी विद्यालय येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग माने सर यांनी केले
Social Plugin