बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील वर्धनगड पाचांगणेवाडी येथे श्री समर्थ सदगुरु शंकर महाराज रसाळ यांच्या कृपा अर्शिवार्दाने श्री इंचगिरी रसाळ सांप्रदाय अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मठाधिपती श्री समर्थ सदगुरु पांडूरंग महाराज रसाळ यांच्या प्रेरणेतून ५० वे सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न झाले. या हरिनाम सप्ताहाला मोलाचे सहकार्य करणारे हभप तुकाराम महाराज रसाळ यांच्या हस्ते विनापूजन करण्यात आले. व्यासपीठ चालक म्हणून हभप सर्जेराव पाचांगणे, माणिक पवार व सुभाष कदम यांनी कामे पाहिले. तर पाचांगणेवाडी येथे १९७६ साली सुरु केलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात सुरुवातीपासून अखंड ५० वर्ष सेवेत कार्यरत असणारे हभप रामचंद्र मुगुटराव पांचागणे (गुरूजी) यांच्यावतीने सहाव्या दिवसाचे औचित्य साधत वेदांत विद्या वाचस्पती सुप्रसिद्ध किर्तनकार हभप डॉ. दिनेश पांडुरंग महाराज रसाळ यांचे सुश्राव्य किर्तन झाले. यावेळी चंद्रकांत पाचांगणे, कुंडलिक पाचांगणे, भोजराज पाचांगणे, समिंद्रा पाचांगणे, विद्या पाचांगणे उपस्थित होते.
या हरिनाम सप्ताहात सुप्रसिद्ध किर्तनकार सागर महाराज बोराटे, चैतन्य महाराज निंबोळे, प्रणिती महाराज खोंडे, अशोक महाराज इलग, नंदकुमार पवार यांची ही किर्तने झाली. तर मठाधिपती हभप पांडूरंग महाराज रसाळ यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. ग्रामस्थ मंडळाच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सप्ताहातील किर्तनसेवेस मृदंगमणीसाथ विठ्ठल सत्रे, गायनसाथ हभप सुरेखाताई चांदुगडे, भुलेश महाराज, निशांत गाढवे, आकाश जगदाळे, रोहनगिरी गोसावी, नंदकुमार शेटे व हार्मोनियमसाथ नारायण सपकाळ, नानासाहेब पाचांगणे यांची लाभली. या हरिनाम सप्ताहातील किर्तनसेवेस शिंपीमळा, पवारवाडी, खिरखंडी, फडतरवाडी, नेर, भाटमवाडी, ललगुण भजनी मंडळाची साथ मिळाली. हभप छाया पांडूरंग महाराज रसाळ यांच्या हस्ते पंचक्रोशीतील महिलांचा सार्वजनिक हळदी-कुंकू सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णु पाचांगणे यांनी केले. तर आभार हभप तुकाराम महाराज रसाळ यांनी मानले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिलाग्रामस्थ, सांप्रदायातील सर्व संतजन वारकरी मंडळी उपस्थित होती.
Social Plugin