Ticker

6/recent/ticker-posts

लागोपाठ तीन स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश...



*भार्गव राजेश बगाडे ची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेंगलोर येथे झाली निवड...* 


प्रतिनिधी@  रामेश्वर तोंडे लोणी गवळी


मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथील श्री राजेश बगाडे व सौ. वैशाली राजेश बगाडे ह्या शिक्षक दाम्पत्याचा, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वाघुड,तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथे पाचव्या वर्गात शिकणारा मुलगा भार्गव राजेश बगाडे याची अतिशय मेहनत व अभ्यासाच्या बळावर भारतीय संरक्षण मंत्रालयाद्वारा चालविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, बेंगलोर येथे निवड झाली आहे. प्रगल्भ बुद्धिमत्ता व अभ्यासूवृत्ती असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे या स्कूलमध्ये शिकण्याचे स्वप्न असते. अतिशय काठीण्य पातळी असलेली लेखी परीक्षा, एम. पी. एस. सी., यु.पी.एस.सी.  सारखी मुलाखत प्रक्रिया अशा विविधांगी प्रक्रियेमधून निवड होणे मोठे जिकिरीचे काम आहे. परंतु भार्गवने ही किमया मेहनत व जिद्दीच्या जोरावर साधली आहे.या स्कूलमध्ये ८० टक्के सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या पाल्यांना प्रवेश मिळतो.तर केवळ २० टक्के सिव्हिलियन्सच्या म्हणजे सामान्य नागरिकांच्या मुलांना प्रवेश मिळतो. 

यामध्ये भार्गवने भारतातून निवडल्या गेलेल्या एकूण ३५० विद्यार्थ्यांपैकी १०६ व्या क्रमांकावर आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. त्याने मिळवलेले यश हे अतुलनीय आणि घवघवीत असून, इतर विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी असे आहे. त्याच्या या यशाबद्दल १ मे महाराष्ट्र दिनी मलकापूरचे सन्माननीय आमदार महोदय श्री.चैनसुखजी संचेती साहेब यांचे हस्ते त्याचा विशेष सत्कार झाला. तसेच मलकापूरचे तहसीलदार श्री राहुल तायडे साहेब यांच्या पुढाकाराने भार्गवचा कौतुक सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी उपविभागीय अधिकारी माननीय संतोष शिंदे साहेब, पोलीस निरीक्षक माननीय कोळी  साहेब, व इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे मलकापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय एन. जे. फाळके साहेब यांच्या पुढाकाराने शिक्षण विभाग पंचायत  समिती मलकापूर तर्फे एन एम एम एस तथा स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्याच्या सत्कार  समारंभातही बुलढाणा डायटचे प्राचार्य माननीय जे. ओ. भटकर साहेब यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भार्गवचा  विशेष सत्कार करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल त्याचे, आई-वडिलांचे, मोठा भाऊ विनीत, सोबतच बगाडे परिवार आणि गुरुजनांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


*नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्येही मिळविले यश*

* भार्गवने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये जिल्ह्यातून चौथा क्रमांक पटकावत तिथेही आपला प्रवेश निश्चित केला आहे.

* महाराष्ट्र शासनाद्वारा घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तो शिष्यवृत्ती साठी पात्र झाला आहे.

* सातारा सैनिक स्कूल व  देशातील इतर सैनिक स्कूल परीक्षेमध्ये सुद्धा अपेक्षित यश संपादन करण्याची खात्री आहे.


"भार्गवच्या या यशाबद्दल आम्ही भोलानाथ शिव परमात्मा, आमचे कुटुंबीय,नातेवाईक, अधिकारी महोदय, वेळोवेळी मार्गदर्शन करणारा आमचा मित्र परिवार, आणि भार्गवचे सर्व गुरुजन यांचे शतशः ऋणी आहोत."-राजेश बगाडे व वैशाली बगाडे (भार्गवचे आई वडील)