Ticker

6/recent/ticker-posts

नागवाणी हायस्कूलचा १०० टक्के निकाल



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल १३ मे रोजी जाहीर झाला असून, यामध्ये येथील श्रीमती एम. आर. नागवाणी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा यंदाही १०० टक्के असा उत्कृष्ट निकाल लागला असून, विद्यालयाने यंदाही आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

श्रीमती एम. आर. नागवाणी हायस्कूलमधील ४९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला पात्र ठरले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, प्राविण्य प्राप्त श्रेणीमध्ये ४२ व प्रथम श्रेणीमध्ये ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हायस्कूलचा विद्यार्थी

अर्पण ढवक याने ९६.८० टक्के गुण मिळवत प्रथम, नंदिनी राठोड ९४.४० टक्के तर सोहन साबणकर याने ९३ टक्के गुण मिळवत शाळेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक विजय नागवानी, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले आहे