काल दिनांक:-१४/०५/२०२५ वार:-बुधवार रोजी धरणगावात (उबाठा) गटाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत धरणगावातील काही कामांविषयी आरोप करण्यात आले. परंतु आरोप करत असताना एकाही पदाधिकाऱ्याने वैयक्तिक स्वरूपाचे कुणाचे नाव न घेता आरोप केले असताना. त्या ठिकाणी उपस्थित असणारे लोकनायक न्यूजचे पत्रकार जितेंद्र महाजन यांनी मात्र आपल्या न्यूज वृत्तवाहिनीला प्रसारित केलेल्या बातमीमध्ये शिवसेनेचे नगरपालिकेतील माजी गटनेते विनय शशिकांत भावे (पप्पू भावे) यांचा धरणगावातील (आका) असा बदनामीकारक वैयक्तिक स्वरूपाचा उल्लेख केलेला आहे.
म्हणून आज रोजीशशिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-महायुतीकडून पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. तसेच नगरपालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पप्पू भावे यांनी पत्रकार जितेंद्र दिलीप महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. वैयक्तिक आकसापोटी माझी सामाजिक बदनामी व्हावी म्हणून काल झालेल्या पत्रकार परिषदेत संबंधित पक्षातील एकाही पदाधिकाऱ्यांनी माझ्या नावाचा उल्लेख कुठेही केलेला नसताना मात्र पत्रकार जितेंद्र महाजन यांनी धरणगाव नगरपरिषदेतील (आका) पप्पू भावे असा उल्लेख केला. पुढील कायदेशीर प्रक्रिया चालू आहे





Social Plugin