Ticker

6/recent/ticker-posts

अव्वाच्या सव्वाघर पट्टी द्या आणि गटारीचं पाणी पिऊन जिवंत राहा .

 


राकेश चौधरी  प्रतिनिधी 

दीड वर्षापासून लिकेज शोधू न शकलेली अमळनेर  पालिकेचे अधिकारी कर्मचारी ठरले अपयशी!

शहरातील डीडी नगर, दादासाहेब देशमुख नगरमधील नागरिक दीड वर्षापासून नळातून येणाऱ्या गटारीसारख्या गडूळ, दुर्गधीयुक्त पाण्याचा तडाखा फुटलेले गटारी  सहन करत आहेत. पिण्याचे पाणीच दूषित असल्याने विविध आरोग्यच्या धोक्यांशी झगडण्याची वेळ सामान्य जनतेवर आली आहे

या प्रकरणात नगरपरिषद आणि मुख्याधिकारी  यांची भुमिका अत्यंत निष्क्रिय आणि बेजबाबदार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, दीड वर्ष उलटून गेलं तक्रारी झाल्या. समाधान शिबिर झालं पण लिकेजचा स्रोत अजनही सापडलेला नाही! हे केवळ दर्लक्ष नव्हे, तर नागरिकांच्या जीवाशी केलेला खेळ आहे

  इतक्या तक्रारींनंतरही लिकेज कोठे आहे हे समजत नसेल तर पाणीपूरवठा विभागावर आणि मुख्याधिकारी  यांच्यावर कारवाई का होत नाही? 

 "गटारीचं पाणी आम्हाला नको! शिंदे साहेब. आता कृती  दाखवा!" 

 उपोषण करायला भाग पाडू नका असे नागरिक आता बोलू लागले आहेत.