गणेश जाधव . महाराष्ट्र ग्रामीण जामनेर प्रतिनिधी.
03/05/2025 वार शनिवार रोजी रात्री नऊच्या सुमारात जामनेर तालुक्यातील वडगाव तिघ्रे येथील राहुल बाम्हंदे यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.जामनेर तालुक्यातील वडगाव तिघ्रे येथील युवक राहुल बाम्हंदे यांचा जामनेर बोदवड रोडवरील लगत नर्सरीच्या शेताच्या जवळ 03/05/2025 रात्री 9 वाजेच्या सुमारात भीषण अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर जमावकऱ्यांनी तात्काळ आरोग्यदूत जालमसिंग राजपूत यांना फोन करून मदतीसाठी बोलावले.घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्यदूत जालमसिंग राजपूत यांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी राहुलला तात्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तब्बेत चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले असून पोटाचे ऑपरेशन केले असता चाळीस टाके पडलेले आहे.
Social Plugin