मितेश जैन - कल्याण प्रतिनिधि
रबाळे:- नवी मुंबई महानगरपालिका संचलित पीएमश्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा.अमोलकुमार वाघमारे यांना डोंबिवली येथील हेल्पिंग हँड्स वेल्फेअर सोसायटी या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अमोल वाघमारे यांनी क्रीडा , शिक्षण त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यासह जवळपास 50 व्यक्ती व 15 संस्थाना सुप्रसिद्ध डॉ विजय चिंचोळे व गीनिज बुक रेकॉर्डर दिनेश गुप्ता यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र , मनी प्लांट व मेडल देऊन नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे संस्थापक समीर चव्हाण , अध्यक्ष प्रियांका कांबळे, उपाध्यक्ष गौरी पाटील, कोषाध्यक्ष विनायक वाड व इतर सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन उत्तम रित्या वक्रतुंड सभागृह, डोंबिवली येथे केले होते दरवर्षी या पुरस्काराने अनेक व्यक्ती व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान संस्थेच्या माध्यमातून केला जातो. वृक्षारोपण, रक्तदान, व्यसनमुक्ती, मतदान पर जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील केलेल्या कामाचे दखल घेऊन क्रीडा शिक्षक प्रा अमोलकुमार वाघमारे यांचा सन्मान हा पुरस्कार देऊन करण्यात आला त्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Social Plugin