Ticker

6/recent/ticker-posts

हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शिंदे नगर अंबड येथे मोफत आरोग्य शिबिर सपन्न



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

 शहरातील शिंदे नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य व उपजिल्हा रुग्णालय अंबड तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालय अंबड चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोरख सुरमवाड उपस्थित होते,अध्यक्ष पदी डॉ.अनिल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी अंबड,डॉ.राहुल बागुल, रमेश राठोड,अशोक चाळक तालुका आरोग्य पर्यवेक्षक,दिलीप अहिरे,नगरसेवक धर्मराज बाबर यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी राष्ट्रीय बाल सुरक्षा कक्षाचे डॉ.दयानंद पांढरे, डॉ.अमोल जाधव,डॉ.कृत्तिका तरटे,डॉ.पौर्णिमा घुगे, डॉ.संदीप लाहोटी,अभिजित देशमुख,फार्मसिस्ट श्रीमती देवबोने,श्रीमती काकड,परिचारिका सविता साबळे,लिया खंडागळे उपस्थित होते.यावेळी १०० पेक्षा जास्त रुग्णांनी मोफत रोगनिदान व उपचाराचा लाभ घेतला आहे.तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आले.आवश्यक रक्त तपासण्या करण्यात आल्या असून सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी HBT आपला दवाखाना शिंदे नगर नगर चे वैद्यकीय अधिकारी डॉ नवनाथ कारके,परिचारिका सरस्वती वाघमारे,आरोग्य सेवक MPW श्री राजेंद्र शिलवंत, प्रयोग शाळा तंत्रज्ञ सचिन भोजने,दिपक राजपूत, छत्रभुज खरे,विनोद सौंदरमल यांनी विशेष सहकार्य केले.शिबिरासाठी डॉ.श्रीकांत पायमोडे,अनंता राऊत यांनी रास्त नियोजन केले आरोग्य शिबिर कार्यक्रमाची प्रस्तावना,मान्यवरांचे स्वागत व आभार डॉ.नवनाथ कारके यांनी केले.