बुध दि. [प्रकाश राजेघाटगे ]
श्री संत गुंडोजी बाबा महाराज व संत बाळूमामा महाराज श्री क्षेत्र विसापूर तालुका खटाव आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवार दिनांक 26 जून रोजी होत असून दिंडीचे प्रस्थान परमपूज्य श्रीमंत आजाद गिरी महाराज मठाधिपती दाजीपूर आजीवन ठाणाधिपती श्री पंच दशनाम जुना आखाडा नील पर्वत त्रंबकेश्वर व परम पूज्य श्री महंत रामेश्वर गिरी महाराज पंचायती महानिर्वाणी आखाडा हरिद्वार यांचे शुभ हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती श्री संत गुंडोजी महाराज देवस्थान ट्रस्ट चेअरमन प्रताप शिंदे व विश्वस्त दीपक सावंत (बापू महाराज) महादेव साळुंखे, नारायण साळुंखे, सुरेश कदम, बाळकृष्ण सावंत, सुहास साळुंखे यांनी दिली आहे.
गुरुवारी सकाळी 26 रोजी 9:15 मिनिटांनी रथ व ध्वज पूजन सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती 108 परमपूज्य श्री महंत सुंदर गिरीजी महाराज पुसेगाव यांचे हस्ते तसेच ह भ प बापू महाराज, ह भ प हनुमंत महाराज मोरे आमलेवाडी, ॲड.विजयराव साळुंखे, प्रवर्तक ह भ प प्रताप शिंदे ह भ प महादेव साळुंखे, श्री गुंडोजी बाबा दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष सयाजी साळुंखे व हरिश्चंद्र सावंत यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे. पालखी दिंडी सोहळा 26 ते सात या दरम्यान होणार असून, नाश्ता जेवण सायंकाळचे भोजन तसेच कीर्तनाची सेवा विसापूर ते पंढरपूर मार्गावरील विविध मान्यवरांच्या वतीने देण्यात येणार आहे. या दिंडी सोहळ्याच्या आरोग्य सुविधेसाठी डॉ.प्रीती येवले, डॉ.विश्वनाथ भांडवलकर, डॉ सचिन शिंदे, डॉ विक्रांत जाधव, डॉ अंबादास कदम, डॉ महेश भिसे, डॉ सावळकर, डॉ संजय कुमार, डॉ विवेक गायकवाड, डॉ व्ही एस निलटे देणार आहेत. या दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळा विसापूर, श्री गुंडोजी बाबा विद्यालय पंचक्रोशीतील भजनी मंडळे, सैनिक संघटना व विसापूर परिसरातील सर्व मंडळे सहभागी राहणार आहेत या दिंडी सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विसापूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin