Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा (लाड ) शहरा मध्ये दि 3 तारखे पासुन अतिक्रमण हटाव मोहिम



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा (लाड ) येथील नगर परिषदेच्या वतीने येत्या ३ जूनपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण धारकांच्या उरात धडकी भरली आहे.

कारंजा नगर परिषदेच्या वतीने दरवर्षी अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात येत असते. मागीलवेळी राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत मुख्य शहर आणि बायपास परिसरातील अनेक कच्चे पक्के बांधकाम काढण्यात आले होते. पण पुन्हा अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणधारकांचे कोणतेही नुकसान झाल्यास त्यास अतिक्रमणधारक स्वतः जबाबदार राहतील.

अतिक्रमणे थाटली असून, हे अतिक्रमण काढण्यासाठी येत्या ३ जूनपासून शहरात पोलिस बंदोबस्तात जेसीबी मशीनच्या सहाय्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे. तत्पूर्वी, अतिक्रमणधारकांनी नगर परिषदेच्या मालकीच्या सार्वजनिक रस्त्यावर, नालीवर अतिक्रमण करून अडथळा निर्माण केला आहे. त्यांनी स्वतःहून ३ जूनपूर्वी अतिक्रमणे काढून घ्यावे अन्यथा महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत अधिनियम १९६५ चे कलम १८० अन्वये अतिक्रमने काढण्यात येईल व त्याकरिता लागणारा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल.

तसेच जप्त केलेले साहित्य परत केले जाणार नाही. या मोहिमेअंतर्गत अतिक्रमणधारकांचे कोणतेही नुकसान झाल्यास त्यास अतिक्रमणधारक स्वतः जबाबदार राहणार आहे, असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज सोनुने यांनी कळविले आहे