यावल प्रितिनिधी( रविंद्र आढाळे)
डोंगरकठोरा येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात आमदार अमोल जावळे यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेतली. यावेळी यावल पंचायत समितीच्या घरकुल विभागाचे कर्मचारी अनुपस्थित असल्याचे लक्षात येताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
शासनातर्फे विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी व ग्रामस्थांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात येत आहेत मात्र अशा शिबिरांमध्ये यावल पंचायत समितीचे घरकुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे दांडी मारत असून अशा मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
आमदार जावळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, घरकुल योजना ही ग्रामीण जनतेच्या मूलभूत गरजांशी संबंधित असून, याबाबत कोणतीही दुर्लक्ष खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. यापुढे कोणत्याही घरकुल संदर्भातील तक्रारी आल्यास, जबाबदार कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या शिबिरात एकूण ८८८ नागरिकांना विविध विभागांकडून थेट सेवा पुरवण्यात आली. मात्र घरकुल विभागाच्या अनुपस्थितीमुळे अनेक ग्रामस्थांची निराशा झाली होती आमदार जावळे यांच्या हस्तक्षेपामुळे आता घरकुलसंबंधी तातडीने कार्यवाही होण्याची आशा निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांसाठी दिलासादायक पाऊल:
आमदार जावळे यांच्या सूचनांमुळे आता पंचायत समितीमार्फत घरकुल प्रकरणांवर विशेष लक्ष दिले जाईल, आणि लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरकुलासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आमदार अमोल जावळे यांनी
Social Plugin