प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले
मेडशी येथील प्रगतशील शेतकरी तथा दैनिक मातृभूमी चे प्रतिनिधी श्री गोरखनाथ मधूकर भागवत यांची मुलगी नामे कु. देवयानी गोरखनाथ भागवत हिने वैद्यकीय क्षेत्राची आवड असल्यामुळे या क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या शिक्षणाबरोबर अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी अकोला येथील स्वामी समर्थ कोचिंग क्लासेस येथे आपल्या वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात करून जिद्द व चिकाटीने अभ्यास करून 2024 25 मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय शिक्षणाची प्रथम पायरी समजल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेमध्ये 92 टक्के गुण प्राप्त करून यश संपादित करत आपले व आपल्या कुटुंबाचे नाव रोशन केले. कु देवयानी गोरखनाथ भागवत हिच्या या यशामुळे कुटुंब व नातेवाईकात आनंदाचे वातावरण असून तिचे या यशाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.आपल्या या यशाचे श्रेय ती आई, वडील, भाऊ, शिक्षक यांना देत आहे.
देवयानीला लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची आवड आहे.व भविष्यात एक चांगले डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करण्याचा स्वप्न मनात बाळगवून ती नेहमी वैद्यकीय क्षेत्राकडे आकर्षित होती आणि तिने या सीईटी परीक्षेमध्ये यश संपादित करून सिद्ध करून दाखविले कि ती भविष्यात एक चांगले डॉक्टर होऊ शकते-गोरखनाथ मधुकर भागवत
*(वडील)*
Social Plugin