Ticker

6/recent/ticker-posts

शैक्षणिक साहित्याचे वाटप



बुध   दि [प्रकाश राजेघाटगे ] 

श्री.शिवाजी विद्यालयात सन २०२५-२६ वर्षाचा प्रारंभ नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तकासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन शाळाप्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवागतांना  वह्या, पाठ्यपुस्तके  व शैक्षणिक साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पहिल्या दिवशी मोफत वह्या, पाठ्यपुस्तके शैक्षणिक साहित्य मिळाल्याने नवागत विद्यार्थ्यांचे चेहरे हरखून गेले 

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ च्या  सत्राचा प्रारंभ सोमवारी झाला. सकाळी दहा वाजता विद्यालयाचे प्रांगण गजबजून गेले. प्रारंभी राष्ट्रगीत ,राज्यगीतानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख अविनाश जंगम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक आर एम डांगे यांनी गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, मोफत वह्या व पाठ्यपुस्तकांचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. उपशिक्षक विलास काटकर यांनी नातू श्रीयांश याच्या वाढदिवसानिमित्त कन्या सौ.प्रतिक्षा सनी पवार यांच्या वतीने इ.पाचवी च्या सर्व विद्यार्थ्यांना लेखनासाठी पॅड उपलब्ध केले त्याचे वाटपही करण्यात आले. कु.श्रावणी शिपटे व पायल जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

 शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल श्री काटकर सर व विद्यार्थ्यांना मिष्टान्न देऊ केल्याबद्दल सौ.फडतरे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी श्री वसंतराव काटकर, अमोल निकम , सुनील जाधव, संतोष गिरी गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यालयाच्या  विविध उपक्रमाचे कौतुक करुन श्री.वसंतराव काटकर म्हणाले, " नूतनीकरणाच्या कामामुळे शाळेची इमारत लक्षवेधी झाली असून कार्यक्रमासाठी सभागृहही उपलब्ध झाले आहे .येथील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहेत हे कौतुकास्पद आहे. यावेळी ज्येष्ठ उपशिक्षक सुनील‌ वायदंडे, सौ.संगिता कर्णे , दत्तात्रय चव्हाण, पुरुषोत्तम सावंत, सौ.वैशाली फडतरे,  तालुका शिक्षकेतर लिपिक संघटनेचे अध्यक्ष बलराम घोरपडे, ग्रंथपाल संगिता जाधव ,अशोक माने, संताजी जाधव यांची ही उपस्थिती होती उपशिक्षक विलास काटकर यांनी आभार मानले.श्री.अविनाश जंगम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.