Ticker

6/recent/ticker-posts

मेडशी बायपासवर भीषण अपघात : दोन ठार, एक जखमी



*कारमधील दोन प्रवासी थोडक्यात बचावले थोडक्यात बचावले*

प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

मेडशी : अकोला-नांदेडराष्ट्रीय महामार्गावरील मेडशी बायपासवर १४ जून रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता भीषण अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. विशेष म्हणजे, कारमधील दोन प्रवासी थोडक्यात बचावले.

घटनेनुसार, आरजे ०९ जीसी ०५४४ क्रमांकाचा ट्रक मालेगावकडून पातूरच्या दिशेने जात असताना त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच ३० बीपी ८२२९ क्रमांकाच्या टैंकरला जोरदार धडक दिली.या धडकेत टँकरचा चालक शेख शोएब शेख मुजीब (वय २५, रा. गंगानगर, अकोला) आणि त्यांना भेटण्यासाठी आलेले दुसऱ्या टँकरचे चालक शेख जावेद शेख सलीम (वय ४५, रा. अर्धापूर, जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात क्लीनर हाफीजसोद्दीन मुजिबोद्दीन (वय ३५, रा. गंगानगर, अकोला) हे जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या जोरदार धडकेमुळे टँकर उलटला आणि रस्त्यालगत उभ्या असलेल्या एमएच ३७एएच १५३१ क्रमांकाच्या कारवर जाऊन आदळला. त्या कारमध्ये बसलेले दोघेही सुदैवाने, बचावले; मात्र, कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.