बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
श्रीस्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नागनाथ माध्य व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मध्ये इ 5वी ते 10वी पर्यंत नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी यांचे ढोल ताशा व झांज पथकने मोठ्या उत्साहाने स्वागत केले . यावेळी बुधच्या प्रथम नागरिक सरपंच सुजाता बोराटे मॅडम , पत्रकार प्रकाश राजेघाटगे , विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे , प्रभारी पर्यवेक्षक नाना दडस तसेच विद्यालयातील प्राध्यापक , शिक्षक शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक यांच्या उपस्थित नवगतांचे स्वागत करण्यात आले . यावेळी प्राचार्य श्री भांगरे सर व विद्यालयातील शिक्षकांनी मान्यवरांचे स्वागत केले . 5वी चे विद्यार्थी तसेच सर्व इयत्तामधील नविन मुलाना मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, वहया , पेन व चॉकलेट तसेच पुस्तके देऊन स्वागत केले .
यावेळी सरपंच सुजता बोराटे मॅडम , पत्रकार प्रकाश राजेघाटगे , प्राचार्य अंकुश भांगरे यांनी आपली मनोगते व्यक्त केले .व विद्यालयातील सर्वच विद्यार्थी -शिक्षक यांना नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या . शैक्षणिक वर्षात स्पर्धा परीक्षा व दहावी , बारावी तसेच इतर शैक्षणिक उपक्रमात चांगले यश मिळवण्यासाठी विद्यार्थी यांनी प्रमाणिक प्रयत्न करावेत असे आव्हान मान्यवरांनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक तानाजी पाटील यांनी केले . ग्रंथपाल नामदेव धनवडे यांनी नविन विद्यार्थी यांना पुस्तके मान्यवरांच्या हस्ते देण्याचे नियोजन केले . तसेच विद्यालयातील इ 5 वी ते 8 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी यांना पाठ्यपुस्तके धनवाडे सर यानी वाटप केले . कार्यक्रमाचे आभार श्री नाना दडस यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला .
Social Plugin