अंबड तालुका प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड येथे उपविभागीय कार्यालयात आणीबाणी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्वातंत्र्य लोकतंत्र सेनानींचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबड-बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण यांची उपस्थिती यावेळी होती.घनसावंगी व अंबड तालुक्यातील २१ लोकतंत्र सेनानी व त्यांच्या पाल्यांचा यावेळी शाल,पुष्पहार व मुख्यमंत्र्यांच्या सहीचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार नारायण कुचे म्हणाले की,महायुती सरकारने लोकतंत्र सेनानी यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना मानधन सुरू केले होते.
परंतु आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी ते बंद केले व आता पुन्हा महायुतीचे सरकार आले तेव्हा मानधन सुरू करून मानधनांमध्ये दुप्पट वाढ ही करण्यात आली आहे.अशाप्रकारे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी व महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानी यांचा सन्मान केला आहे.कारण लोकतंत्र सेनानी यांच्यामुळेच आज आम्ही सत्तेमध्ये आहोत असे ते बोलताना म्हणाले.या कार्यक्रमात लोकतंत्र सेनानी यांनी त्यांचे अनुभव कथन केले.या कार्यक्रमास नगरपरिषद मुख्यधिकारी मनोज उकिरडे,पोलीस निरीक्षक संतोष घोडके,रमेश भाऊ पैठणे,औदुंबर बागडे,सुरेश गुढे,केदार सेठ मंत्री,दिपक लोहकरे,सौरभ मालक कुलकर्णी,बाबुराव मामा खरात,संदीप दादा खरात,बाबासाहेब वैराळ,शाहूल खरात,लक्ष्मण राक्षे,जितेंद्र परदेशी आदी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.लोकतंत्र सेनानी यांचे नातेवाईक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
Social Plugin