बदनापुर: लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, बदनापुर केंद्रात मार्गदर्शन व प्रयोगांचे प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी "विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेपासून दूर राहून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा. प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घ्यावी," असे प्रतिपादन अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते दिलीप शिखरे यांनी केले. लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, बदनापुर केंद्र आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत होते, या प्रसंगी अंधश्रध्दा निर्मुलन समिती रफीक सर हे उपस्थित होते.या कार्यक्रमात अंधश्रद्धेविरोधातील विविध प्रयोगांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. अंगारे, झपाटणे, लिंबू-मिरची, भुताखेताचे चमत्कार यामागील वैज्ञानिक स्पष्टीकरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आली. या प्रयोगांमुळे अंधश्रद्धा व चुकीच्या समजुतींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाला लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे कैलास कोल्हे व सोनाली कोरडे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून, अंधश्रद्धा निर्मूलनाचे आणि शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी प्रयोग व मार्गदर्शन ऐकताना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अनेकांनी प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन ट्रस्टच्या बदनापुर केंद्राच्या वरती उत्कृष्ट नियोजनाद्वारे केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि असे कार्यक्रम नियमितपणे घडावे, अशी मागणी व्यक्त केली.
Social Plugin