लोकसेवक व लोकप्रतिनिधी यांना इतकी डेरिंग येथे कुठून :-जावेद धन्नू भवानीवाले(अर्जदार)
-मेडशी येथील गवळीपुरा येथील रहवासी असलेले जावेद धन्नू भवानीवाले या ग्रामस्थाने दि 12/02/2025 मेडशी ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिवतथा मेडशी ग्रामपंचायत चे सरपंच यांच्याकडे धन्नू भवानीवाले यांच्या घरासमोरील नाली ते आंबेडकर चौक पर्यंतच्या नालीची दुरुस्ती व तिचे खोलीकरण करून नवीन बांधकाम करून देण्याबाबतची मागणी करत सविस्तर अर्ज सादर केले.परंतु त्यानी दिलेल्या अर्जावर आज पर्यंत कुठलीही उपाययोजना न करता दिलेल्या अर्जाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ध्वनि यंत्र,तथा प्रत्यक्ष भेटल्यावर ग्रामसेवक व सरपंच यांच्या कडून उडवा उडवीची उत्तरे व आश्वासनच मिळत आहे. साधारण व्यक्तीला होणारा हा त्रास फार जास्त मोठी गोष्ट नही
परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेचा दुय्यम भाग असलेल्या मालेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या जा क्र पसमा/पं/554 /2025 पंचायत समिती मालेगाव दिनांक 29/2 /2025 च्या पत्राला मेडशी ग्रामपंचायत कार्यालय यांच्या कडून केराची टोपली दाखवणे ही फार चुकीचे बाब आहे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता गोर गरीब नागरिकयांच्या समस्येकडे दुर्लक्ष करून.स्वतःचे कार्य विसरून काम करणाऱ्या लोकसेवक व लोकप्रतिनिधी यांना इतकी डेरिंग येथे कुठुन, ग्रामपंचायत स्तरावरील नागरिकांच्या लहान शहाणं समस्येचे निवारण होत नसेल तर गावात ग्रामपंचायतची गरज काय. नागरिकांनी दाद कोणाकडे मागावी. असे अनेक प्रश्न अर्जदार यांच्या मनात निर्माण होत आहे
Social Plugin