Ticker

6/recent/ticker-posts

देऊळगाव राजा शहरांमधील बायपासच्या जाफराबाद चौफुलीवर जबर अपघात: महिला ठार, पाच जण जखमी..

 



टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 

देऊळगाव राजा-जाफराबाद चौफुलीवर असलेल्या धोकादायक वळणावर पुन्हा एकदा गंभीर अपघात झाला असून, यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

ही दुर्घटना गुरुवार दुपारी सुमारे चारच्या सुमारास घडली. बीड जिल्ह्यातील काही भाविक शेगावकडे दर्शनासाठी निघाले होते. देऊळगाव राजा-जाफराबाद मार्गावरील चौफुलीवर अचानक समोर उभा असलेला ट्रक न दिसल्यामुळे त्यांची चारचाकी गाडी थेट ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली. धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की आजूबाजूच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. ‘वाचवा वाचवा’ अशी आर्त किंकाळी सुरू झाली.

या अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार साहेब व ठाणेदार ब्रह्म गिरीयांनी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचविण्यात आले.

दरम्यान, या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांत संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.