मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले:-
मालेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा मेडशी पोलिस चौकीतील कोलदरा फाटा (अकोला– वाशिम रोड) येथे सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या तिघी महिलांना रंगेहात पकडत ११.७०० किलो गांजा जप्त केला. या अंमली पदार्थांचे बाजारमूल्ये तब्बल १ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९.४० ते ११.३० वाजेदरम्यान करण्यात आली. अटक केलेल्या महिलांमध्ये मुक्ताबाई अशोक जाधव (५२) आणि सुशीला भानुदास जाधव (४५) दोन्ही रा. गणेशपुर ता. मालेगाव, ह.मु. राजनगाव, जि. छत्रपती संभाजीनगर तसेच सरस्वती गोपीचंद चव्हाण (७५) रा. धानोरा भुसे ता. मानोरा, ह.मु. हिजवडी, जि. पुणे यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिला अकोला–वाशिम मार्गावरील मेडशी–कोलदरा फाटा परिसरात गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रवि सैबेवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. पथकात प्रशिक्षणार्थी पीएसआय शिल्पा लोंढे, एएसआय सुनंदा गाडे, एएसआय बेबी, हेडकॉन्स्टेबल सुनिल पवार, शिवाजी काळे, मनिष राठोड, दिलिप राठोड, भानुदास निवाणे, विजेंद्र इंगोले, जितू पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, गणेश मेटांगले, धम्मकिर्ती घनबहादूर, वैशाली तायडे यांचा समावेश होता.
जप्त केलेला ११.७०० किलो गांजा आणि इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अटक केलेल्या महिलांविरुद्ध मादक पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin