Ticker

6/recent/ticker-posts

सारळ प्राथमिक शाळेत नवागतांचे जल्लोषात स्वागत .



अलिबाग (रत्नाकर पाटील)

अलिबाग तालुक्यातील सरळ येथील जनता शिक्षण मंडळ अलिबाग या संस्थेच्या  शाळेत अगदी उत्साही वातावरणात सर्व नवीजीन प्रवेश घेतलेल्या व इतर सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेकडून करण्यात आले .मोठ्या उन्हाळी सुट्टीनंतर मुलांनी शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ मध्ये शाळेत पहिले पाऊल टाकले . त्यांच्या स्वागतासाठी शाळेची छान सजावट केली होती . 

गुलाब पुष्प व तोंड गोड करून फुलांच्या वर्षावात मुलांचे शाळेत स्वागत झाले . पर्यावरण रक्षणाची जबाबदारी म्हणून मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . मुलांच्या स्वागतासाठी सदस्य.सुशील पाटील व ऋषिकेश नाईक तसेच मोठ्या प्रमाणात पालक व शिक्षक वृंद, शाळेचे शिक्षक संतोष मढवी,पूनम मढवी  उपस्थित होते.