टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जाफराबाद तालुक्यातील लहुजी सेनेच्या वतीने भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपती मुर्मु आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाफराबाद तहसीलदार मार्फत दि.२५ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता येत्या ०१ ऑगस्ट २०२५ रोजी होत आहे. साहित्य आणि समाजकारण यात आदरणीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. मागास समाजातून पुढे आलेले आदरणीय अण्णाभाऊ यांनी वंचित समाजाच्या व्यथा, वेदना आपल्या साहित्यकृतीतून अतिशय परिणात्मकरित्या मांडल्या. त्यांना मारणोत्तर भारतरत्न 'किताब देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र सुखदेव मस्के,अमोल दांडगे आदीची
Social Plugin