Ticker

6/recent/ticker-posts

जो दुसऱ्यांना मोठे करतो, तोच खरा मोठा होतो! – माजी आमदार रामहरी रूपनवर



अलिबागमध्ये काँग्रेसच्या दोन दिवसीय युवा प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


अलिबाग(रत्नाकर पाटील)

 रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथे युवा काँग्रेसचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे."जो दुसऱ्यांना मोठे करतो, तोच खरा मोठा होतो!" या विचारातून अॅड. रामहरी रूपनवर यांनी तरुण कार्यकर्त्यांना प्रेरित करत काँग्रेसची विचारधारा, ऐतिहासिक वाटचाल आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, तरुणांनी संघटित होऊन काम केले पाहिजे. काँग्रेसची लोकोपयोगी धोरणे सध्याच्या सरकारने फक्त नावं बदलून पुन्हा मांडली आहेत. राहुल गांधी यांच्या पदयात्रांना मिळणारा प्रतिसाद हा काँग्रेसच्या जनाधाराचा पुरावा आहे.

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "पक्षाशी एकनिष्ठ राहणे हेच खरे योगदान आहे. आजही अनेक पक्षांकडून मला ऑफरयेतात, पण मी काँग्रेसशी एकनिष्ठ आहे.  रायगड जिल्ह्यातील तरुणांसाठी काँग्रेसकडे संधींचा मोठा खजिना आहे. आपल्याला शून्यापासून सुरुवात करून पुन्हा काँग्रेसची ताकद निर्माण करायची आहे."कार्यक्रमाचे स्वागत सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी केले आणि शिबिरामागील हेतू विषद केला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार अॅड. रामहरी रूपनवर, एसटी काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे, काँग्रेस नेत्या राणी अग्रवाल, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, अँड.श्रद्धा ठाकूर, योगेश मगर, भास्कर चव्हाण, मार्तंड नाखवा, अखलाख शिलोत्री आणि नयना घरत हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.

या प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्ह्यातील शेकडो  तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिबिरात विविध विषयांवर सत्रे आयोजित करण्यात आली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर तरुणांना वैचारिक व संघटनात्मक दृष्टिकोनातून सज्ज करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

त्यावेळी निखिल ढवळे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष, वैभव पाटील पनवेल ओबीसी सेल अध्यक्ष, देवेंद्र पाटील सरचिटणीस रायगड जिल्हा, आकाश राणे उपाध्यक्ष युवक काँग्रेस रायगड, किरीट पाटील उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, राजीव पाटील पर्यावरण सेल रायगड जिल्हा अध्यक्ष, चंद्रशेखर ठाकूर माजी सदस्य कोप्रोली, लंकेश ठाकूर महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष, अशफाक पानसरे नागोठणे काँग्रेस अध्यक्ष आदी उपस्थित होते.