बुध दि .[: प्रकाश राजेघाटगे ]
कित्येक जन्माची पुण्याई म्हणून आपण शिक्षकी पेशात येत असतो आणि त्यातील प्रामाणिक सेवेबद्दल मिळालेला सन्मान आणि कौतुकाची थाप अधिक ऊर्जा देणारी असते आणि तेच काम हिंदी महामंडळ करत आहे असे प्रतिपादन कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा.श्रीधर साळुंखे यांनी केले.
राष्ट्रभाषा हिंदी भवन संभाजीनगर, सातारा येथे मंडळाच्या कार्यात हिंदी विषयासाठी बहुमोल योगदान देणारे कराड तालुक्याचे अध्यक्ष फैयाज संदे, माण तालुक्याचे अध्यक्ष अस्लम शेख, आझाद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सौ. शोभा पाटील व प्रा. डॉ. अर्चना धोंगडे, सौ. गायत्री पवार, गोरख रुपनवर यांचा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रो. डॉ. प्रदीप शिंदे होते. तर अध्यक्षस्थानी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य सुनील शिंदे होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ता. का. सूर्यवंशी, उपाध्यक्ष शाहनवाज मुजावर, इकबाल मुल्ला, परीक्षामंत्री शिवाजीराव खामकर, महामंडळ कोषाध्यक्ष सुधाकर माने, कार्यवाह अनंत यादव, सौ.सुनंदा शिवदास, नारायण शिंदे व सर्व तालुका अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. साळुंखे पुढे म्हणाले,सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य दीपस्तंभासारखे महान असून हिंदी भाषेला जिल्हा,राज्य व राष्ट्रामध्ये प्राधान्याचे स्थान प्राप्त करून देण्यात ता.का. सूर्यवंशी व त्यांच्या टीमचे मोलाचे योगदान आहे.
डॉ. प्रदीप शिंदे म्हणाले, हिंदी मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्याची संपूर्ण देश ओळख ठेवेल.डॉ सुनील शिंदे अध्यक्ष भाषणात म्हणाले, शिक्षक हा आदर्श व्यक्तींचा समूह आहे. प्रत्येक पिढीला व मूल्याधिष्ठित समाज निर्मितीला प्रवृत्त करण्याचे काम शिक्षक करत असतो. प्रास्ताविक पर भाषणात मंडळाचे अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी यांनी मंडळाच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला.
ईशस्तवन, स्वागतगीत अनिल कदम, सौ. गायत्री पवार, संजय काटवटे यांनी सादर केले. सूत्रसंचालन मीनाक्षी बडीगार यांनी केले. तर सुधाकर माने यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी हणमंत सूर्यवंशी, विजयकुमार पिसाळ,दिनकर माथने, मनोहर काटकर,विकास लादे,विकास चव्हाण,व्यवस्थापक नवनाथ शिंदे व त्यांचे सहकारी यानी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास हिंदी अध्यापक मंडळाचे सर्व कार्यकारी मंडळ पदाधिकारी, सदस्य, विभागांचे परीक्षा प्रमुख, राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेचे संचालक,सल्लागार, हिंदी शिक्षक व सर्व निमंत्रित बहुसंख्येने उपस्थित होते.
Social Plugin