Ticker

6/recent/ticker-posts

सकल मराठा सामाजिक संस्थेच्या अलिबाग तालुकाध्यक्षपदी अभय म्हामुणकर



संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

अलिबाग (रत्नाकर पाटील)

सकल मराठा सामाजिक संस्थेच्या अलिबाग तालुका अध्यक्षपदी अभय म्हामुणकर यांची सर्वानुमते निवड  करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील कुरुळ  येथे संपन्न झालेल्या संस्थेच्या  वार्षिक सर्वसाधारण सभेत अलिबाग तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये अभय म्हामुणकर यांच्याकडे तालुकाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

यावेळी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे नववे वंशज , राज्य शासनाच्या गड किल्ले संवर्धन समिती सदस्य रघुजीराजे आंग्रे, जय भवानी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ऍड. मिलिंद चव्हाण, सकल मराठा सामाजिक संस्थेचे सल्लागार नरेश सावंत, सल्लागार अनिल गोळे आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सकल मराठा सामाजिक संस्था अलिबागच्या मावळत्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर नवनिर्वाचित कार्यकारिणीतीळ पदाधिकाऱ्यांचा सन्मानदेखील यावेळी करण्यात आला. मराठा समाजाला एकत्रित करून संघटना बळकट करणे आणि मराठा जात प्रमाणपत्र व मराठा जात पडताळणी याबाबत या सभेत चर्चा करून शंकांचे निरसन करण्यात आले. 

सकल मराठा सामाजिक संस्थेच्या अलिबाग तालुकाध्यक्षपदी अभय म्हामुणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्षपदी समरस शेळके, उपाध्यक्ष कृष्ण जाधव, उपाध्यक्ष नंदकुमार पवार, उपाध्यक्ष प्रेरणा कदम, उपाध्यक्ष जगदीश सावंत, सचिव उल्हास पवार, सहसचिव नयन जरांडे, खजिनदार सुरेंद्र शेळके, सहखजिनदार राम कदम, संघटक प्रदीप ढवळे, तर सदस्य म्हणून आनंद जाधव, दीपक गावडे, प्रभाकर मोहिते, संजय राणे, विजेंद्र गावडे, सुरेश साळुंखे, जितेश जवके, तृप्ती घोसाळकर, प्रज्ञा पाशिलकर, सुषमा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावरील मान्यवर रघुजीराजे आंग्रे, ऍड. मिलिंद चव्हाण, नरेश सावंत, अनिल गोळे, समरस शेळके यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी अलिबाग तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित होते.